कोरोना चाचणीपासून बचाव करण्यासाठी आदीवासींचे पलायन!

गोमंन्तक वृत्तसेवा
सोमवार, 31 मे 2021

बनरावत या आदीवासी समुदयाला केंद्र सरकारने 1967 साली 'नामशेष होण्याच्या बेतात असलेली आदिम जमात' जाहीर केले होते.

देशात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढू लागल्यामुळे केंद्र आणि राज्यांनी लसीकरणाची मोहीम राबवण्यास सुरुवात केली. असं असताना दुसरीकडे मात्र उत्तराखंडमधील (Uttarakhand) पिथोरागढ जिल्ह्यातील (Pithoragarh) आरोग्य कर्मचाऱ्यांचे एक पथक अलीकडेच आदीवासींच्या (tribal) खेड्यातील लोकांची कोरोनाची चाचणी करण्यासाठी गेले, तेव्हा त्यांच्यापासून सुटका करण्यासाठी हे लोक जवळच्या जंगलात पळून गेले. कुटा चौरानी हे गाव 'बनरावत' (Banrawat) या नामशेष होत चाललेल्या जमातीच्या लोकांचे निवासस्थानहे. (Tribes flee to escape corona test)

कोरोनाची चाचणी करण्यासाठी एक आरोग्य पथक आपल्या गावात येणार असल्याची खबर मिळताच हे आदीवासी शेजारच्या जंगलामध्ये पळून गेले, असे डीडीहाटचे उपविभागीय दंडाधिकारी के. एन. गोस्वामी (K. N. Goswami) यांनी रविवारी सांगितले. बनरावत या आदीवासी समुदयाला केंद्र सरकारने 1967 साली 'नामशेष होण्याच्या बेतात असलेली आदिम जमात' जाहीर केले होते.

केंद्राकडून राज्यांना रेमडिसिव्हीर इंजेक्शन मिळणार नाही; जाणून घ्या कारण

'बनरावत या जमातीचे 500 सदस्य डीडीहाट उपविभागातील 8 वस्त्यांमध्ये राहत आहेत. कोरोना चाचणी पथके औलतारी, जमतारी आणि कुटा चौरानी खेड्यांमध्ये पाठवण्यात आली होती. जमतारी आणि औलतारी खेड्यातील 191 स्थानिक आदीवासी कोरोनाची चाचणी करण्यासाठी तयार झाले होते. मात्र कुटा चौरानी खेड्याच्या रहिवाशांनी मात्र शेजारच्या जंगलात पलायन केले,' असे गोस्वामी यांनी सांगितले.

कोरोना चाचणी करताना वापरल्या जाणाऱ्या पट्टीमुळे (स्वॅब स्ट्रीप) आपल्याला संसर्ग होईल अशी या आदीवासींना भीती वाटत होती, असे गोस्वामी यांनी सांगितले. 'आम्ही आरोग्याची तपासणी आणि औषधे घेण्यासाठी तयार आहोत मात्र ही पट्टी शरीरामध्ये शिरु देणार नाही, हे आम्हाला कदापि मान्य नाही' असे कुटा चौरानी खेड्यातील बनरावत समुदयातील जगत सिंघिग राजावर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या