बंगालमधील हिंसाचारामुळे राज्यसभेत तृणमूल कॉंग्रेसच्या खासदाराचा राजीनामा

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021

राज्यसभेत अर्थसंकल्पावर चर्चा  सुरु असतानातच  मोठी  घडामोड  घडली असून  तृणमूल  कॉंग्रेसचे  खासदार  दिनेश  त्रिवेदी  यांनी  राजीनामा दिला आहे.

नवी दिल्ली: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन  यांनी  अर्थसंकल्प  मांडला. राज्यसभेत अर्थसंकल्पावर चर्चा  सुरु असतानातच  मोठी  घडामोड  घडली असून  तृणमूल  कॉंग्रेसचे  खासदार  दिनेश  त्रिवेदी  यांनी  राजीनामा दिला आहे. त्रिवेदी  यांनी राज्यसभेत आपण  राजीनामा देणार असल्याचे  घोषणा केली होती. पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांची स्तुती सुध्दा त्यंनाी यावेळी केली. बंगालमध्ये  निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर हिंसाचार वाढला  आहे  हे  पाहून  आपली  घुसमट  होत  असल्याची  भावना  देखील  यावेळी  त्यांनी व्यक्त  केली  होती. आधीच  तृणमूल  कॉंग्रेसचे  अनेक  जेष्ठ  नेत्यांनी  भाजपमध्ये  प्रवेश केले  आहेत.

राज्यसभेत  तृणमूलचे  खासदार  दिनेश  त्रिवेदी  यांनी  पश्चिम  बंगालमध्ये  सुरु असणाऱ्या हिंसाचाराचा  उल्लेख  करत  आपली  हळहळ  व्यक्त केली. ते म्हणाले, ''मी आज राज्यसभेचा  राजीनामा  देत  आहे. मला  राज्यसभेत  पाठवल्याबद्दल  मी  माझ्या  पक्षाचा आभारी आहे. पण  माझ्या  राज्यात  हिंसाचार  सुरु आहे  आणि  यामध्ये  मी काहीही  करु  शकत  नाही. यामुळे  माझी  घुसमट  होत आहे. असे  त्यांनी  यावेळी सांगितले. जर  मी  राज्यसभेत  बसून  काहीच  करु  शकत  नसल्यास  तर  मी राजीनामा  दिला  पाहिजे असं माझं मन सांगत आहे. मी राजीनामा देत असलो तरी बंगालच्या लोकांसांठी सतत  सेवा  करत  राहीन.''

पश्चिम  बंगालमध्ये  आगामी  काळात निवडणूका  होणार  आहेत. भाजप  आणि  तृणमूल  कॉंग्रेस  यांच्यातील  राजकिय  आरोप- प्रत्यारोपांच्या  फैरी  अधिक आक्रमक झाल्या आहेत. त्यातच  तृणमूल  कॉंग्रेसच्या  अनेक  जेष्ठ  नेत्यांनी आपल्या  पक्षाला रामराम  ठोकत त्यांनी  भाजपमध्ये  प्रवेश  केला आहे. यामुळे  बंगालच्या  मुख्यमंत्री ममता  बॅनर्जी  यांच्यात  अडचणीत  वाढचं  होत आहे. दरम्यान  राज्यसभेतून  राजीनामा दिल्यानंतर  खासदार  दिनेश  त्रिवेदी  भाजपमध्ये  प्रवेश  करणार  असल्याची  चर्चा राजकीय  वर्तुळात  चांगलीच  रंगली  आहे.    

संबंधित बातम्या