Tripura CM: त्रिपुराचे CM पोहोचले थेट ऑपरेशन थिएटरमध्ये, 10 वर्षाच्या चिमुरडीवर केली शस्त्रक्रिया

Tripura CM: त्रिपुराचे मुख्यमंत्री झाल्यानंतर माणिक साहा जवळपास वर्षभर राजकीय कामांव्यतिरिक्त आपली जुनी जबाबदारी पार पाडताना दिसले.
Tripura CM Manik Saha
Tripura CM Manik SahaDainik Gomantak

Tripura CM: त्रिपुराचे मुख्यमंत्री झाल्यानंतर माणिक साहा जवळपास वर्षभर राजकीय कामांव्यतिरिक्त आपली जुनी जबाबदारी पार पाडताना दिसले. व्यवसायाने डॉक्टर असलेले त्रिपुराचे मुख्यमंत्री साहा यांनी बुधवारी एका 10 वर्षांच्या मुलावर यशस्वी दाताची शस्त्रक्रिया केली.

दरम्यान, साहा यांनी त्रिपुरा (Tripura) मेडिकल कॉलेजमध्ये एका मुलावर ओरल सिस्टिक लेशन सर्जरी केली. साहा हे त्रिपुरातील प्रसिद्ध मॅक्सिलोफेशियल सर्जन आहेत. साहा हे त्यांच्या जुन्या कार्यस्थळी, त्रिपुरा वैद्यकीय महाविद्यालयात पोहोचल्यावर त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांनी स्वागत केले.

Tripura CM Manik Saha
Tripura New CM: माणिक साहा त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री

तसेच, या महाविद्यालयात त्यांनी 20 वर्षांहून अधिक काळ सातत्याने लोकांवर उपचार केले. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसण्यापूर्वी साहा हे ओरल आणि मॅक्सिलोफेशियल विभागाचे प्रमुख होते.

'कधी थांबल्यासारखे वाटले नाही'

प्रसारमाध्यमांशी बोलताना साहांनी सांगितले की, 'दीर्घ विश्रांती घेतल्यानंतर शस्त्रक्रिया केल्यानंतर खूप आनंद होत आहे.' सीएम साहा पुढे म्हणाले की, 'मी स्वतःला कधीच आपल्या व्यवसायापासून दूर केले नाही.'

Tripura CM Manik Saha
Tripura New CM Oath: माणिक साहा यांनी त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ

मुलाला ही समस्या होती

मीडिया रिपोर्ट्सनुसार, साहा यांनी ज्या मुलावर शस्त्रक्रिया केली होती, त्याला तोंडाच्या वरच्या भागात सिस्टिक ग्रोथचा त्रास होत होता. या त्रासामुळे त्या मुलाच्या सायनसच्या हाडांवरही परिणाम होऊ लागला होता. पुढील महिन्यातच राज्यात निवडणुका होणार आहेत. भाजपसह (BJP) सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com