पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यात 12 नागरिक जखमी

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

जम्मू काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यात आज दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात बारा नागरिक जखमी झाले. काकापोरा भागात तैनात असलेल्या सुरक्षा जवानांना लक्ष्य करत दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.

श्रीनगर : जम्मू काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यात आज दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात बारा नागरिक जखमी झाले. काकापोरा भागात तैनात असलेल्या सुरक्षा जवानांना लक्ष्य करत दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. मात्र, त्यांनी फेकलेला हातबाँब जवानांजवळ न पडता रस्त्यातच फुटल्याने बारा नागरिक जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काकापोरा भागात नाकेबंदी करण्यात आली असून दहशतवाद्यांना शोधण्यासाठी मोहिम सुरु करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या