सरकारच्या आदेशासमोर ट्विटर झुकले; ते अकाउंट्स केले ब्लॉक

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

नेटवर्किंगच्या बाबतीत सर्वात फास्ट असलेले सोशल मीडिया साइट ट्विटरने अखेर केंद्र सरकारचे म्हणणे ऐकले. आणि आता आक्षेपार्ह अकाउंट ब्लॉक करण्यास सुरवात देखील केली आहे.

नवी दिल्ली: नेटवर्किंगच्या बाबतीत सर्वात फास्ट असलेले सोशल मीडिया साइट ट्विटरने अखेर केंद्र सरकारचे म्हणणे ऐकले. सरकारने दिलेल्या आदेशावरून आक्षेपार्ह अकाउंट ब्लॉक करण्यास सुरवात देखील केली आहे. ट्विटरने आपल्या कंपनीच्या उच्च अधिकाऱ्याच्या अटकेच्या आणि आर्थिक दंडाच्या भीतीने हा निर्णय घेतला आहे.

सरकराने सांगितलेले अकाउंट्स ट्विटरने आता ब्लॉक करायला सुरवात केली आहे. भडकावू आणि आक्षेपार्ह पोस्ट करणारे अकाउंट आता बंद केले जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अमेरिकेच्या मायक्रो-ब्लॉगिंग कंपनीवर गेल्या काही दिवसांपासून दबाव होता, कारण ट्विटरवर #ModiPlanningFarmerGenocide या हॅशटॅगसह अनेक पोस्ट्स केल्या जात होत्या.

केंद्र सरकारकडून दबाव निर्माण झाल्यानंतर ट्विटरने माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69अ अंतर्गत अशा खात्यांच्या यादीवर नजर ठेवून बंद केले आहेत ही यादी माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने पाठविलेली आहे. ट्विटरने या अकाउंट्स संबंधी देखरेख करत आसल्याचे आश्वासन दिले आहे आणि या अकांउंटवरून होत असलेल्या पोस्ट एकत्रित केल्या जात आहे.

आतापर्यंत 709 अकाउंट्स निष्क्रिय करण्यात आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार 277 ​​ट्विटर हँडल्स आहेत ज्यांनी #ModiaPlanningFarmerGenocide या हॅशटॅगसह पोस्ट केले आहे. काही दिवसांगोदर यापैकी 126 अकाउंट्स ब्लॉक केली गेली आहेत.

याव्यतिरिक्त, सरकारचा असा संशय आहे की 1,178 ट्विटर हँडल खलिस्तानी आणि पाकिस्तानाशी जोडले आहे. जे चुकीच्या माहितीचा प्रसार करत आहेत. अशा 583 अकाउंट्स ब्ल़क केली गेली आहेत. आयटी कायद्याच्या कलम 69 अ अंतर्गत ट्विटरच्या वरिष्ठ अधिका्यांना सात वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली जाऊ शकते अशी चेतावणी  देण्यात आली आहे.

सहारनपूरमध्ये प्रियंका गांधींची महापंचायत; जिल्ह्यात कलम 144 लागू -

माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वतीने असे म्हटले होते की, ट्विटर मध्यस्थी म्हणून काम करत असते , म्हणून भारत सरकारच्या सूचनांचे पालन करणे ही त्याची जबाबदारी आहे. ट्विटरने असे करण्यास नकार दिल्यास त्याचा फटका त्याला सहन करावा लागेल. ट्विटच्या कंटेंटवर नजर ठेवण्यासाठी ट्विटरचे स्वतःचे एक स्वतंत्र धोरण आहे, परंतु सरकारच्या दबावानंतर कंपनीला सरकार वर आपत्तीजनक टिका करण्यात आलेली ती अकाउंट्स ब्टॉक करावी लागत आहे.

गोवा कार्निव्हल : या फ्लाईट्समध्ये घेता येणार खास गोवन जेवणाचा आस्वाद -

संबंधित बातम्या