Farmers Protest : हिंसक घटनेनंतर ट्विटरने बंद केली 550 हून अधिक जणांची टिव-टिव

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 27 जानेवारी 2021

केंद्राने केलेल्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात प्रजासत्ताक दिनादिवशी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले होते.

केंद्राने केलेल्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात प्रजासत्ताक दिनादिवशी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले होते. राजधानीत ट्रॅक्टर रॅलीच्या वेळेस झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात ट्विटरने आज 550 हून अधिक अकॉउंटस डिऍक्टिव्हेट केली आहेत. याशिवाय ट्विटरवरून मीडिया धोरणाच्या उल्लंघनाविरुद्ध करण्यात आलेल्या ट्विट्सवर मार्क करण्यात आल्याचे देखील ट्विटर कडून सांगण्यात आले आहे. ट्विटरच्या प्रवक्त्याने आज यासंदर्भात माहिती दिली. 

Farmers Protest : हिंसक घटनेनंतर दोन शेतकरी संघटनांची आंदोलनातून माघार 

केंद्र सरकारने केलेल्या नवीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी मागील दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमारेषेवर आंदोलन करत आहेत. आणि या आंदोलनाचाच भाग म्हणून शेतकऱ्यांनी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ट्रॅक्टर परेडचे आयोजन केले होते. व यावेळी दिल्लीच्या काही भागात पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चकमक घडल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर आज ट्विटरकडून हिंसाचार, गैरवर्तन आणि धमकी देण्याचा प्रयत्न करणाऱ्या खात्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती ट्विटरने दिली आहे. ट्विटरच्या अधिकृत प्रवक्त्याने ट्रॅक्टर रॅलीच्या दरम्यान घडलेल्या हिंसक घटनेसंदर्भात 550 हून अधिक खाती हटविण्यात आल्याचे सांगितले. 

ट्विटरच्या प्रवक्त्याने हिंसाचार, गैरवर्तन आणि धमक्यांचा प्रयत्न करणाऱ्यांपासून ट्विटर माध्यमाचे संरक्षण करण्यासाठी कठोर कारवाई केली असल्याचे सांगितले. तंत्रज्ञानाचा वापर करून ट्विटरने मोठ्या प्रमाणात ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन करणारी शेकडो खाती आणि ट्विट्सवर कारवाई केल्याची माहिती या प्रवक्त्याने दिली. याशिवाय स्पॅम आणि ट्विटर या माध्यमाचा वापर करून फेरफार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा 550 अकॉउंटसला बंद करण्यात आल्याचे प्रवक्त्याने सांगितले. याव्यतिरिक्त, ट्विटरच्या मीडिया धोरणाचे उल्लंघन करत असलेल्या काही ट्विट्सला मार्क देखील करण्यात आल्याचे या प्रवक्त्याने नमूद केले. 

दरम्यान, यापूर्वी दिल्ली पोलिसांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शेतकर्‍यांच्या प्रस्तावित ट्रॅक्टर परेडमध्ये व्यत्यय आणण्यासाठी पाकिस्तानकडून 300 हून अधिक ट्विटर अकॉउंटस तयार करण्यात आल्याची माहिती दिली होती. तर रॅलीच्या वेळेस घडलेल्या हिंसक घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी कारवाई करण्यात सुरवात केली असून, काही एफआयआर देखील दाखल केले आहेत.     

संबंधित बातम्या