भाजपचा संसार उघड्यावर, दोन दिग्गज नेत्यांमधील ट्विटर वॉर चव्हाट्यावर

या धमक्या दुसऱ्या कोणाला तरी द्या हे मोदी (Modi) आहेत, त्यांना संपवायला तुमच्यासारखे असे अनेक आले आणि गेले असे बग्गा (Tejinder Pal Singh Bagga) यांनी सांगितले. एका फोटोवरु या दोघांमध्ये हे वॉर रंगले, आता हा वाद थेट व्ही.पी.सिंग सरकारच्या (VP Singh Government) दरबारी जाऊन पोहोचला आहे.
भाजपचा संसार उघड्यावर, दोन दिग्गज नेत्यांमधील ट्विटर वॉर चव्हाट्यावर
भाजपचे (BJP) खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramaniam Swamy) यांचे भाजप नेते यांच्यासोबत झालेले ट्विटर वॉर (Twitter War) सध्या चांगलेच चर्चेत आहे. Dainik Gomantak

भाजपचे (BJP) खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramaniam Swamy) यांचे भाजप नेते यांच्यासोबत झालेले ट्विटर वॉर (Twitter War) सध्या चांगलेच चर्चेत आहे. एका फोटोवरु या दोघांमध्ये हे वॉर रंगले, आता हा वाद थेट व्ही.पी.सिंग सरकारच्या (VP Singh Government) दरबारी जाऊन पोहोचला आहे.

आपल्या स्पष्टवक्ते पणामुळे नेहमीच चर्चेत राहणारे सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. ते सध्या सरकारच्या परराष्ट्र आणि वित्त धोरणांविरोधात लिहीत आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे भाजपा देखील अस्वस्थ आहे. परंतु सुब्रमण्यम स्वामींना याबाबत फारशी चिंता वाटत नाही. त्यांनी सरकारला अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे.

भाजपचे (BJP) खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramaniam Swamy) यांचे भाजप नेते यांच्यासोबत झालेले ट्विटर वॉर (Twitter War) सध्या चांगलेच चर्चेत आहे.
'सुब्रमण्यम स्वामी यांचा भाजपला घरचा आहेर'

ते म्हणाले, मी एका मताने व्हीपी सरकार पाडले होते. त्यामुळे उगाच मला डिवचू नका, असे सांगत त्यांनी सांगितले. भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव तेजिंदर पाल सिंह बग्गा (Tejinder Pal Singh Bagga) यांनी सुब्रमण्यम स्वामी यांचा एक फोटो शेअर करत त्यांनी विरोधकांशी हातमिळवणी केल्याचा गंभीर आरोप केला आहे. मात्र, नंतर हा फोटो बनावट असल्याचे समोर आहे. त्यामुळे सुब्रमण्यम स्वामी यांनी बग्गा यांच्यावर कारवाईची मागणी केली. या दोघांमध्ये येथूनच या वादाला सुरुवात झाली, तो अद्याप थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. आता तर हा वाद थेट सरकार पाडण्यापर्यंत येऊन पोहोचला आहे.

भाजपचे (BJP) खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramaniam Swamy) यांचे भाजप नेते यांच्यासोबत झालेले ट्विटर वॉर (Twitter War) सध्या चांगलेच चर्चेत आहे.
राहुल गांधींचे अकांउंट सस्पेंड केलेच नाही: ट्विटर

मी व्हीपी सिंग यांचे सरकार पाडले ही आहे, आणि राजीव गांधी यांच्या पाठिंब्याने सरकार बनविले देखील आहे. तसेच भाजपसरकार विरोधात पीव्हीएनआर सरकारला देखील मी मदत केली आहे. त्यामुळे उगाच मला डिवचू नका मी आरएसएस आणि व्हिआयपींच्या आशिर्वादाने भाजपमध्ये सामील झालो आहे. त्यामुळे विचारधारा महत्त्वाची आहे. बग्गा भाजमध्ये येण्याआधी ते अनेकवेळा तुरुंगात गेले आहेत. हे सत्य भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांन माहित असायला हवे होते.

यावर बग्गा यांनी पुन्हा ट्विटकरत उत्तर दिले आहे. ते म्हणाले, या धमक्या दुसऱ्या कोणाला तरी द्या हे मोदी आहेत, त्यांना संपवायला तुमच्यासारखे असे अनेक आले आणि गेले असे बग्गा यांनी सांगितले. तसेच माझ्यावरील आरोप अद्याप सिध्द झालेले नाहीत, ते सिध्द करण्यासाठी तुमच्याकडे 48 तास आहेत. असेही त्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.