धक्कादायक! देशात आढळले कोरोनाचे दोन नवीन स्ट्रेन 

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

देशात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये घट होत असल्याचे दिसून येत असतानाच, आता कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन आढळला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज दिली आहे.

देशात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये घट होत असल्याचे दिसून येत असतानाच, आता कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन आढळला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज दिली आहे. देशातील महाराष्ट्रात, तेलंगणा आणि केरळ मध्ये कोरोनाच्या विषाणूचे दोन नवीन प्रकार समोर आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. महाराष्ट्र, तेलंगणा आणि केरळ मध्ये N440K व E484Q हे दोन प्रकार सापडले आहेत. मात्र या राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या बाधितांमध्ये झालेल्या वाढीसाठी कोरोनाचे हे दोन नवीन प्रकार जबाबदार आहेत, यावर कोणताही वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नसल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. 

भारताची संरक्षण सज्जता वाढणार; अर्जुन टॅंकच्या खरेदीला हिरवा कंदील  

कोरोनाचे महाराष्ट्र, तेलंगणा आणि केरळ मध्ये N440K व E484Q हे दोन नवीन प्रकार सापडले असून, मात्र त्याच्यामुळेच या संबधीत राज्यांमध्ये कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ झाली असल्याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नसल्याचे नीती आयोगाचे आरोग्य संबंधित सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी सांगितले. यानंतर आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी देखील काही राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संक्रमणासाठी कोरोना विषाणूचा नवीन प्रकार N440K व E484Q कारणीभूत असल्याचा कोणताही निश्चित पुरावा नसल्याचे म्हटले आहे. याशिवाय E484Q हा कोरोना विषाणूचा प्रकार मागील वर्षाच्या जुलै मध्ये चार ठिकाणी आढळला होता. तर N440K हा प्रकार मागील वर्षाच्या मे आणि सप्टेंबर महिन्यात तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि आसाम मध्ये आढळून आल्याचे  डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले.            

त्यानंतर, आतापर्यंत देशात 187 जणांना युके मध्ये आढळून आलेल्या नव्या कोरोना विषाणू स्ट्रेनची लागण झाली असल्याची माहिती डॉ. व्ही के पॉल यांनी आज दिली. तसेच सहा जणांना दक्षिण आफ्रिकेतील आणि एकाला ब्राझिल मध्ये सापडलेल्या नव्या कोरोनाच्या स्ट्रेनची लागण झाल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी पुढे सांगितले. याव्यतिरिक्त, देशात कोरोनाच्या विषाणूचे उत्परिवर्तन सतत आणि बारकाईने पाहिले जात असल्याचे डॉ. व्ही के पॉल यांनी अधोरेखित केले. आणि 3500 विषाणूंचा क्रम लावण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली. परंतु, मागील काही दिवसांमध्ये देशातील काही ठिकाणी होणाऱ्या वाढीत या नवीन कोरोनाच्या विषाणूचा प्रकार कारणीभूत नसल्याची माहिती सध्यातरी मिळाली असून, यावर अजून संशोधन करण्यात येत असल्याचे डॉ. व्ही के पॉल यांनी सांगितले. 

आंदोलक शेतकरी साजरा करणार 'दमन विरोधी दिवस' आणि 'पगडी संभाल दिवस...

तसेच, मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली गर्दी ही कोरोनाच्या वाढत्या प्रसारणासाठी धोकादायक ठरत असल्याची चेतावणी डॉ. व्ही के पॉल यांनी आज दिली. व कोरोनाच्या खबरदारीसाठी म्हणून प्रत्येकाने फेस मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन, वारंवार हात धुणे आणि गर्दीत टाळणे गरजेचे असल्याचे आवाहन त्यांनी केले.       

संबंधित बातम्या