शोपियान मध्ये झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार, तर एक जवान शहिद

indian army.jpg
indian army.jpg

काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील वानगाम मध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये मोठी चकमक झाल्याचे समजते आहे. शनिवारी दक्षिण काश्मीरमधील वांगम येथे झालेल्या भीषण चकमकीत सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. या चकमकीत दुर्दैवाने सुरक्षा दलाच्या एका जवानाला वीरमरण आले असून, दोन जण जखमी झाले आहेत. चकमक झालेल्या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाल्यानंतर या ठिकाणी सुरक्षा यंत्रणांकडून शोधमोहीम राबण्यात आली होती. (Two terrorists killed and one jawan martyred in an encounter in Shopian district) 

दहशतवाद्यांशी झालेल्या या चकमकीत भारतीय सैन्यातील जवान आर.आर. के. पिंकू यांना वीरमरण आले. तर, जखमी झालेल्या दोन जवानांची प्रकृती सुद्धा  चिंताजनक असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. गेल्या 36 तासात काश्मीर घाटी मध्ये शहीद झालेले पिंकू कुमार हे तिसरे सुरक्षा कर्मचारी आहेत. यापूर्वी  गुरुवारी सायंकाळी लावेपोरा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले होते. शनिवारी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एकाचे नाव मोहम्मद अमीन शेख असून, मागील तीन वर्षांपासून तो हिजबुल मुजाहिद्दीन मध्ये कार्यरत होता. तसेच, हिजबुल मुजाहिद्दीनच्या इनायत उल्ला शेखचा मुलगा असल्याचे देखील समजते आहे.  ठार झालेल्या दुसऱ्या दहशतवाद्याचे नाव  आदिल अहमद मलिक असून तो, अनंतनाग जिल्ह्यातील धनवटपोरा कोकरनाग येथील निवासी असल्याची माहिती मिळते आहे. तर मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून एक एम ओ -4 रायफल, एक ए.के रायफल आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.

शोपियानमधील (shopian) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार पोलीस (Police) आणि भारतीय सैन्याच्या सीआरपीएफ दलाच्या (CRPF) 34 जवानांकडून हर्मेन येथे शोधमोहीम राबवली जात होती. दरम्यान, या ठिकाणी दहशतवाद्यांच्या (Terrorist)) भेटीगाठी होणार असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणाना मिळाली होती. यावेळी, सुरक्षा दलाने वानगाम- डानगाम परिसराला काही घरांना वेढा घालण्यास सुरुवात केली असता,  तेथे लपलेल्या अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला. या चकमकी दरम्यान सैनिकांनी अनेकदा दहशतवाद्यांना शरण येण्यास सांगितले, मात्र दहशतवाद्यांनी गोळीबार चालूच ठेवला. यावेळी सैनिकांनीही प्रत्युत्तर दिले, आणि एक दहशतवादी ठार झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com