अरुणाचल प्रदेशात दोन आठवडे पूर्ण लॉकडाउन

PTI
सोमवार, 20 जुलै 2020

 मंत्रिमंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी हा निर्णय घेतला आहे.

इटानगर

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरमध्ये पुढील दोन आठवडे कडक लॉकडाउन करण्यात येणार आहे. सोमवारी (ता. 20) सकाळी पाच वाजल्यापासून 3 ऑगस्टपर्यंत पूर्ण लॉकडाउन राहणार आहे, असे राज्याचे मुख्य सचिव नरेश कुमार यांनी रविवारी सांगितले. मंत्रिमंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी हा निर्णय घेतला आहे. कोरोना रुग्णांच्या चाचण्या आणि त्यांना उपचार देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला काही वेळ देणे गरजेचे आहे. लॉकडाउनच्या काळात अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर कोणतीही वाहतूक होणार नाही. जिल्हा प्रशासनाकडून अत्यावश्‍यक सुविधा घरपोच करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच किराणा मालाची दुकाने खुली ठेवण्यात येणार आहेत. महत्त्वाची शासकीय कार्यालये खुली ठेवण्यात येणार आहेत. जलद सुविधेसाठी जिल्हा प्रशासनाची 20 पथके तयार करण्यात आली आहेत, असे कुमार यांनी या वेळी सांगितले.

संपादन- अवित बगळे

संबंधित बातम्या