Udaipur: कन्हैयालाल यांच्या मुलाचा प्रण, जोपर्यंत नराधमांना फाशी होत नाही तोपर्यंत...

Udaipur Killing Case: याप्रकरणी आतापर्यंत 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Yash
YashTwitter/ @ANI

Udaipur Killing Case: उदयपूर हत्याकांडाप्रकरणी कन्हैयालाल यांच्या मोठ्या मुलाने वडिलांच्या मारेकऱ्यांना जोपर्यंत फाशी होत नाही, तोपर्यंत पायात काहीही घालणार नाही, असा प्रण घेतला आहे. घरातून ऑफिसला जातानाही तो पायात काहीही घालत नाही. या खून प्रकरणाचा तपास एनआयए करत आहे. याप्रकरणी आतापर्यंत 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, अजूनही अनेकांची चौकशी सुरु आहे. कन्हैयालाल यांचा मोठा मुलगा यश याने सांगितले की, या प्रकरणातील आरोपींना (Accused) फाशी होत नाही, तोपर्यंत पायात काहीही घालणार नाही.

Yash
Udaipur Killing Case: उदयपूर हत्याकांडातील 9 व्या आरोपीला NIA ने केली अटक

यशने पुढे सांगितले की, 'हे हत्याप्रकरण लोकांच्या विस्मरणात गेले आहे, परंतु मी 28 जूनपासूनच शूज किंवा चप्पल घालणे बंद केले होते. वडिलांच्या हत्येनंतर सरकार (Government) आणि जनतेने खूप मदत केली. आताही लोक कुटुंबाप्रती सहानुभूती व्यक्त करत आहेत. मी त्यांचा ऋणी आहे. पण सर्वकाही मिळाल्यावरही मला माझे वडील सापडत नाहीत.'

दुसरीकडे, 27 जून 2022 रोजी आरोपी मोहम्मद रियाज आणि गौस मोहम्मद यांनी कन्हैयालाल यांची गळ्यावर चाकूने वार करुन निर्घृण हत्या केली होती. यानंतर दोन्ही आरोपींनी एक व्हिडिओही जारी केला होता. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही (Prime Minister Narendra Modi) धमकावण्यात आले होते. या घटनेनंतर अवघ्या चार तासांतच पोलिसांनी आरोपींना पकडले होते.

Yash
Udaipur Murder Case: तीन आरोपींना पोलीस कोठडी, चौघांची तुरुंगात रवानगी

तसेच, या कटात सहभागी असलेल्या आणखी सात जणांना अटक करण्यात आली आहे. भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. कन्हैयालाल यांनी या प्रकरणासंबंधी आक्षेपार्ह स्टेटस आपल्या मोबाईलवर ठेवले होते. त्यामुळे कन्हैयालाल यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com