
Udhayanidhi Stalin Slams Amit Shah Message On Hindi Diwas: सनातन धर्माची डेंग्यू, मलेरिया आणि कोरोनाशी तुलना करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिन यांनी आता हिंदीवर वक्तव्य केले आहे.
उदयनिधी स्टॅलिन यांनी अमित शाह यांच्या हिंदी दिवसाच्या संदेशावर जोरदार प्रहार करत म्हटले की, जी भाषा फक्त चार-पाच राज्यात बोलली जाते, ती संपूर्ण भारताला एकत्र आणते असे कसे म्हणता येईल.
उदयनिधी स्टॅलिन हे तामिळनाडूचे (Tamil Nadu) मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आहेत. अलीकडेच, त्यांनी सनातन धर्माला एक आजार म्हटले होते आणि त्याच्या निर्मूलनाबद्दल वक्तव्य केले होते. त्यानंतर संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली होती.
वास्तविक, हिंदी दिन दरवर्षी 14 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. गृहमंत्री अमित शाह यांनी देशवासियांना हिंदी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
शाह म्हणाले की, जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतातील (India) भाषांच्या विविधतेला जोडणारे नाव 'हिंदी' आहे. स्वातंत्र्य चळवळीपासून ते आजपर्यंत देशाला जोडण्यात हिंदीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
ते पुढे म्हणाले की, हिंदी दिनानिमित्त राजभाषा हिंदीसह सर्व भारतीय भाषांना बळकटी देण्याचा ठराव घ्यावा.
अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर उदयनिधी स्टॅलिन यांची सोशल मीडियावर प्रतिक्रिया आली. स्टॅलिन यांनी म्हटले की, मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानाचा निषेध करतो, ज्यात त्यांनी दावा केला आहे की हिंदी ही भारताची एकात्म शक्ती आहे आणि ती इतर प्रादेशिक भाषांना सशक्त करत आहे.
देशात फक्त चार-पाच राज्यांतच हिंदी बोलली जाते आणि त्यामुळे अमित शाह यांचे विधान पूर्णपणे बेताल आहे. हिंदी भाषा लादण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. तामिळनाडू आणि केरळचे उदाहरण देत उदयनिधी यांनी शाह यांच्या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित केला.
ते म्हणाले की, आम्ही येथे तामिळ बोलतो, तर केरळ मल्याळम बोलतो. हिंदी आपल्याला कुठे एकत्रित आणि सक्षम करते? गृहमंत्री अमित शाह यांनी इतर भाषांना केवळ प्रादेशिक भाषा म्हणू नये. त्यांनी हे अत्याचार थांबवले पाहिजेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.