Union Budget 2021: शेतक-यांना दिली जाणारी रक्कम वाढणार

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प अर्थसंकल्पात मांडण्यात आला. आहे. आता शेतक-यांना जी रक्कम दिली जाते त्यात वाढ होऊन ती दर महिना 10 हजार रुपये एवढी करण्यात येणार आहे.

2021 चे राष्ट्रीय बजेट अर्थमंत्री निर्मला सीतारमण  संसदेत सादर करत आहे. कोरोनामुळे भारताला आर्थिक  अडचणीचा  सामना करावा लागला. आतापर्यंत केवळ 3 वेळा अर्थसंकल्पात असे सांगण्यात आले आहे की, भारतीय अर्थव्यवस्था मंदीकडे आहे. परंतु, यावेळी कोरोनासारख्या जागतिक संकटामुळे असे झाले आहे. पण अर्थव्यवस्था रुळावर येईल असा विश्वास अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प अर्थसंकल्पात मांडण्यात आला. आहे. आता शेतक-यांना जी रक्कम दिली जाते त्यात वाढ होऊन ती दर महिना 10 हजार रुपये एवढी करण्यात येणार आहे. शेतमालाल दिडपट हमी भाव देण्याचे सरकारचे उद्धीष्ट्य आहे. 

गहू उत्पादकांना 75 हजार 60 कोटींच्या मदतीची तरतूद करण्यात आली आहे. यावर्षी शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचं उद्दीष्ट सरकारने जाहीर केले आहे. धान्य उत्पादक शेतकऱ्यांसाठी  1.72 लाख कोटी जाहीर केला असून 1 हजार कृषी बाजारपेठा ऑनलाईन यंत्रेनेशी जोडणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

सरकारने दिलेले आत्मनिर्भर पॅकज जीडीपीच्या 13 टक्के इतके आहे. कोरोना संकटात RBI ने 27 लाख कोटीं रूपयाचे पॅकेज दिले आहे. या अर्थसंकल्पात नवीन आरोग्य योजनांवर 64 कोंटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबराबर आत्मनिर्भर भारत योजनेसाठी 130 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सर्वांना शिक्षण देण्याचे सरकारचे लक्ष्य असल्याचेही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले. गरिबांच्या हितासाठी शासनाने आपली संसाधने वाढविली आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजना,  आत्मा निर्भर भारत पॅकेजेस घोषणा करण्यात आली आहे.

 

संबंधित बातम्या