union budget 2021: अर्थमंत्र्यांनी गुरुदेव रविंद्रवाथ टागोरांच्या वचनाचा दिला दाखला

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

 अर्थमंत्री  निर्मला सीतारामन यांनी  भारतीय  अर्थव्यवस्थेला  कोरोनाच्य़ा काळात  धक्का  बसलेला  असताना  देशाचा  अर्थसंकल्प  मांडला  आहे.

budget 2021:  अर्थमंत्री  निर्मला सीतारामन यांनी  भारतीय  अर्थव्यवस्थेला  कोरोनाच्य़ा काळात  धक्का  बसलेला  असताना  देशाचा  अर्थसंकल्प  मांडला  आहे. कोरोनाच्या काळात मोठ्याप्रमाणात बेरोजगारी वाढली असताना अर्थव्यवस्थेवरील  मळभ अजूनही तसेच दिसत आहे. अशा परिस्थितीत अर्थसंकल्प  मांडत  असताना  गुरुदेव  रविंद्रनाथ  टागोर यांच्या  वचनाचं स्मरण  सीतारामन यांनी  केले  आहे. त्यांनी  यावेळी म्हणाल्या, ''भारताने कोरोनाच्या  महामारीचा  एकदम  यशस्वी  पध्दतीने  सामना  केला  आहे. जगाच्या  तुलनेत कोरोनामुळे  भारतात  मृत्यूचे  प्रमाण कमी होतं अस  सीतारामन  म्हणाल्या. गुरुदेवांच्या वचनाचा उल्लेख  करत त्यांनी  भारताने  ऑस्ट्रेलियाच्या  विरोधात  जिंकलेल्या  मालिका  विजयाचा दाखलाही  यावेळी दिला.

Union Budget 2021: उज्ज्वला योजनेचा होणार विस्तार

त्यापुढे म्हणाल्या,'' मी  रविंद्रनाथ  टागोर  याचे  काही  शब्द   घेत आहे. विश्वास  असा  एक  असा  पक्षी  आहे  की,  जो  पहाटे  दाट  अंधार  असतानाही  प्रकाशाची अनभुती  घेत  असतो  त्याबरोबर  तो  गातोही. कोरोनाच्या कठीण  काळात  या अर्थसंकल्पाची  तयारी  करण्यात  आली. देशात  यापूर्वी  अशा  पध्दतीची  तयारी  कधीही तयारी  करण्यात  आली  नव्हती. कोरोना  उपचारासाठी  आज  देशात  कोविशील्ड  आणि कोव्हॅक्सीन  या  लसी  उपलब्ध  आहेत. येणाऱ्या  काळात  अजून  दोन  लसी  लवकरात लवकर  येणार  आहेत.  सरकारने  कोरोना  काळात  80  कोटी  लोकांना   मोफत  अन्न देण्यात  आले  आहे.  कोरोनाच्या   सारख्या  संकटाच्या   काळात  यंदाचा  अर्थसंकल्प  हा खास  आहे. योग्यवेळी  कोरोनाचं  संकट  लक्षात आल्यानंतर  सरकारने  लॉकडाऊन  केले. ते  केले  नसते  तर  कोरोनाचे  संकट  प्रचंड  प्रमाणात  वाढले  असते. असे  सीतारामन यांनी  यावेळी  म्हणाल्या.      

संबंधित बातम्या