Union Budget 2021 : यंदाच्या अर्थसंकल्पाबद्दल जाणून घ्या

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

आरोग्य, शिक्षण, संरक्षण या महत्त्पूर्ण क्षेत्रात कोणत्या नव्या तरतूदी केल्या जाणार, याकडे सर्वसामानंयांचं लक्ष लागून आहे. या बजेटचे लाईव्ह अपडेट्स खास आपल्यासाठी..

नवी दिल्ली : कोरोना आणि आर्थिक संकटात होरपळलेली अर्थव्यवस्था सावरण्याच्या कोणत्या उपाययोजना अर्थसंकल्पात असतील याकडे लक्ष लागले आहे. आरोग्य, शिक्षण, संरक्षण या महत्त्पूर्ण क्षेत्रात कोणत्या नव्या तरतूदी केल्या जाणार, याकडे सर्वसामानंयांचं लक्ष लागून होतं. पेपरलेस बजेट हे या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य ठरलं. सकाळी 11 वाजता विरोधकांच्या गोंधळात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प वाचनास सुरूवात केली.

जाणून घ्या या अर्थसंकल्पातील तरतूदींबद्दल

-  पेट्रेल आणि डिझेलवर कृषी अधिभार लागणार, थेट ग्राहकांना फटका बसणार नाही

- सोनं-चांदी स्वस्त होण्याची शक्यता 

- 75 वर्षांवरील नागरिकांना आयकर भरायची गरज नाही

- टॅक्स ऑडिटची मर्यांदा 5 कोटींवरून 10 कोटी

- रेल्वेसाठी 1 लाख 10,000 कोटांची तरतूद

- भारतात पहिल्यांदाच डिजिटल जनगणना होणार

- लेहमध्ये केंद्रीय विद्यापीठ उभारणार : अर्थमंत्री

- 100 नवीन सैनिक शाळा उभारण्याची अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा

- लहान सिंचन प्रकल्पांसाठी ५ हजार कोटींची तरतूद

- शेतमालाला दिडपट भाव देण्याचं सराकारचं उद्दिष्ट

- बँकांचा व्यवहार पारदर्शक करण्यावर भर देत बँक पुनर्पूंजीकरणासाठी सरकारने 20,000 कोटी रुपये दिले आहेत.

अर्थसंकल्पाचं वाचन सुरू असताना सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला

आरोग्य राष्ट्रीय आरोग्य केंद्राच्या पायाभूत सुविधांसाठी तरतूद -प्रत्येक जिल्यात इंटिग्रेटेड लॅब उभारणार -१५ आवश्यक आरोग्य केंद्रं आणि २ मोबाइल हॉस्पिटलची घोषणा - आरोग्य योजनांसाठी ६४ हजार रुपयांची तरतूद -35 हजार कोटी फक्त कोविड 19 च्या लसीसाठी

"हा अर्थसंकल्पा सहा क्षेत्रांवर उभारला आहे - आरोग्य आणि कल्याण, भौतिक व आर्थिक भांडवल, पायाभूत सुविधा, भारताचा सर्वसमावेशक विकास, मानवी भांडवलचं पुनरुज्जीवन, नूतनीकरण व अनुसंधान व विकास, किमान शासन व जास्तीत जास्त प्रशासन" : केंद्रीय अर्थमंत्री

"भारताने दोन कोरोना प्रतिबंधक लसींची निर्मिती केली, आणखी दोन लसी लवकरच उपलब्ध होतील" - अर्थमंत्री निर्मला सीतारामन

ऑस्ट्रेलियातील टीम इंडियाच्या ऐतिहासिक कामगिरीचं अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याकडून कौतुक

"कोरोना काळात सरकारने गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला : अर्थमंत्री निर्मला सीतारामन "

 "आरोग्यसेवांसाठी अधिक तरतूद हवी तसेच संरक्षण क्षेत्रासाठी अधिक निधी द्यावा " - राहुल गांधी

 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय सादरीकरणाला सुरूवात केली आहे

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन संसदेत पोहोचले आहेत.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन व केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर हे संसदेत पोहोचले आहेत. 

संबंधित बातम्या