Union Budget 2021: अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचे उत्तर व्हायरल; महीला पत्रकाराने प्रश्न विचारला असता अडवले आणि...

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

पत्रकार अर्थसंकल्पाबाबत प्रश्न विचारत असताना एका महीला पत्रकाराने एक प्रश्न विचारला आणि त्यानंतर सलग दुसरा प्रश्न विचारला असताना अधिकाऱ्यांनी त्यांना थांबविले.

नवी दिल्ली:  अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये वार्षिक अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर आणि मंत्रालयातील आधिकाऱ्यांसोबत पत्रकार परिषद घेतली. पत्रकार अर्थसंकल्पाबाबत प्रश्न विचारत असताना एका महीला पत्रकाराने एक प्रश्न विचारला आणि त्यानंतर सलग दुसरा प्रश्न विचारला असताना अधिकाऱ्यांनी त्यांना थांबविले. 'पुरुष पत्रकारांना पण प्रश्न विचारण्यास थांबवायचे होते,' असे निर्मला सीतारामन यांनी म्हणताच, पत्रकार परिषदे मध्ये अचानक हास्यमय वातावरण तयार झाले.

“या वर्षातील अर्थसंकल्प 2021-2022 गाव आणि शेतकरी, यांच्या दृष्टीने महत्वाचा आणि फायदेशीर आहे. शेतकऱ्यांना सशक्त बनवण्याचा निर्धार या अर्थसंकल्पात आहे. शेतकऱ्याचा शेतमालाला दीड-पट हमीभाव देण्याची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तसेच गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षात मोठ्या प्रमाणात कर्जाची तरतुद केली आहे.” असे वक्तव्य अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला; कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप -

कोरोनाकाळात लावलेल्या लॅाकडाउनमुळे अर्थव्यवस्था ढासळली होती. लॅाकडाउन नंतर अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली. नविन दशकामधला पहिला अर्थसंकल्प काल सादर करण्यात झाला. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी शेतकऱ्यासाठी काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

या अर्थसंकल्पात लडाख बरोबर दक्षिण भारतातील राज्यांवर विशेष भर देण्यात आला आहे. नियम सुलभ करून 'इज ऑफ लिव्हिंग' वर देखील लक्ष केंद्रित केलेआहे. रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी, एमएसएमई क्षेत्रासाठी दुप्पट निधी वाढविण्यात आला आहे. तरुणांना मदत करण्यासाठी संशोधन आणि संशोधनावरही भर देण्यात आला आहे. असे नरेंद्र मोदी म्हणाले.

रावणाच्या लंकेत पेट्रेल स्वस्त,मात्र रामराज्यात महाग का ? -

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाचे समर्थन केले आहे. हा अर्थसंकल्प जनतेच्या हिताचा आहे. समाजातील मुलभुत घटकांचा विकास होणार आहे. असे फडणवीस म्हणाले.

संबंधित बातम्या