Union Budget 2021: गोवा मुक्तीदिन हिरक महोत्सवासाठी 300 कोटी रुपयांची तरतूद

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी गोव्याच्या मुक्ती वर्धापन दिनानिमित्त 300 कोटी रुपयाचा निधी जाहीर केला आहे.

नवी दिल्ली: 60 व्या गोवामुक्ती दिनाच्या विकासासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी गोव्याच्या मुक्ती वर्धापन दिनानिमित्त 300 कोटी रुपयाचा निधी जाहीर केला आहे. हा भारताच्या समृद्ध इतिहासामधील महत्त्वपूर्ण टप्पा आहे. केंद्रीय अर्थमंत्री  निर्मला सीतारामण यांनी त्यांच्या बजेट भाषणात गोवा मुक्तीदिनाचा विशेष उल्लेख केला आहे. गोवा मुक्तीचे हिरक महोत्सवी वर्ष गोवा राज्य साजरे करत आहे, केंद्र सरकारने त्यासाठी 300 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

विशेष म्हणजे गोवा मुक्तीचे हिरक महोत्सवी वर्ष गोवा राज्य साजरे करत आहे, केंद्र सरकारने त्यासाठी 300 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याबद्दल अर्थमंत्री निर्मला सितारामण यांचे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ट्विट करून आभार मानले आहे. 

 

संबंधित बातम्या