Union Budget 2021: उज्ज्वला योजनेचा होणार विस्तार

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

उज्ज्वला योजनेचा विस्तार 1 कोटीहून अधिक लाभार्थींमध्ये करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे.  शहर गॅस वितरण नेटवर्कमध्ये आम्ही पुढील तीन वर्षांत आणखी 100 जिल्हे जोडणार आहोत.

नवी दिल्ली: उज्ज्वला योजनेचा विस्तार 1 कोटीहून अधिक लाभार्थींमध्ये करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे. शहर गॅस वितरण नेटवर्कमध्ये आम्ही येत्या तीन वर्षांत आणखी 100 जिल्हे जोडणार आहोत, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

जम्मू-काश्मीरमध्ये गॅस पाइपलाइन प्रकल्प हाती घेण्यात येईल असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले. उज्ज्वला मोफत स्वयंपाक गॅस एलपीजी योजना आणखी एक कोटी लाभार्थींपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे सरकारने आज अर्थसंकल्पात सांगितले आहे. 2021-22 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की कोविड 19 च्या लॉकडाऊन दरम्यान इंधन पुरवठा खंडीत न होता नियमित चालू होता. 

त्या पुढे म्हणाल्या की,  वाहनांना सीएनजी गॅस देण्याचे, शहर गॅस वितरण नेटवर्क आणि घरकुलांना पाइपलाइन गॅसचा विस्तार योजना पुरविण्यात येणार आहे. आणखी 100 जिल्ह्यांपर्यंत येत्या तीन वर्षात ही योजना पोहचणार आहे.  सीतारमण यांनी गॅस आधारित अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गॅस पाइपलाइनमध्ये सामान्य वाहक क्षमतेचे नियमन करण्यासाठी ट्रान्सपोर्ट सिस्टम ऑपरेटर (टीएसओ) देखील जाहीर केले. 

 

संबंधित बातम्या