Union Budget 2021 : आगामी काळात निवडणुका असणाऱ्या राज्यांसाठी भरीव तरतूद

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

देशात आगामी काळात निवडणुका असणाऱ्या राज्यांसाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात विशेष तरतूद केली आहे.

नवी दिल्ली :  देशात आगामी काळात निवडणुका असणाऱ्या राज्यांसाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात विशेष तरतूद केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला यांनी निवडणुक असलेल्या राज्यांमध्ये 3500 कि.मी. चे राष्ट्रिय महामार्ग बांधण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पश्चिम बंगाल या आगामी काळात निवडणुका होणाऱ्या राज्यांसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. तमिळनाडूसाठी केलेली टेक्सटाईल पार्क आणि इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या घोषणांकडे तमिळनाडूतील राजकिय समीकरण बदलण्याचा प्रयत्न म्हणून पाहिलं जात आहे.

Union Budget 2021: यंदाच्या बजेटमधील 5 महत्वाचे निर्णय

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं, तमिळनाडूमधील नॅशनल हायवे प्रोजेक्ट अंतर्गत आर्थिक कॉरिडॉर बांधले जाणार आहे. केरळमध्ये 1100 कि,मी. लांबीचा राष्ट्रीय महामार्ग बनवला जाणार आहे, ज्यासाठी 65 हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. याद्वारे मुंबई-कन्याकुमारी आर्थिक कॉरिडॉर बांधले जाईल. पायाभूत सुविधांसाठी हे प्रकल्प महत्त्वाचे मानले जात आहेत.

चिंताजनक! कोरोनाच्या संकटामुळे सरकारी तिजोरीवरील भार वाढणार 

पश्चिम बंगालला विशेष भेट

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पश्चिम बंगालला एक विशेष भेट दिली आहे. कोलकाता-सिलिगुडीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प जाहीर करण्यात आला आहे. तसंच,पश्चिम बंगालमधील अनेक भागांमध्ये राष्ट्रिय महामार्ग उभारण्याचीदेखील घोषणा केली आहे. पुढील तीन वर्षात आसाममध्येदेखील महामार्ग आणि आर्थिक कॉरिडॉर उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे.

तमिळनाडूमध्ये फिशिंग हार्बर तयार केले जाणार असून, तमिळनाडूला फिश लॅंडिंग सेंटर म्हणून विकसित करण्यात येणार आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी नुकतीच तमिळनाडूला भेट दिली होती. त्यांनी तमिळनाडूतील वस्त्रोद्योग क्षेत्रातील लोकांची भेट घेत, मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी भरीव तरतूद केली आहे.

संबंधित बातम्या