केंद्रीय शिक्षणमंत्री एम्स रुग्णालयात दाखल, बारावीचा निर्णय लांबणीवर

दैनिक गोमंतक
मंगळवार, 1 जून 2021

बारावीच्या परीक्षेसंदर्भात त्यांची आज असणारी बैठक देखील  पुढे ढकलण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोरोना कोरोना विषाणूनंतर होणाऱ्या त्रासामुळे रमेश पोखरियाल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री ( Education Minister) रमेश पोखरियाल निशंक यांची प्रकृती खालावली. त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात (AIIMS Hospital)  दाखल करण्यात आले आहे. बारावीच्या परीक्षेसंदर्भात त्यांची आज असणारी बैठक देखील पुढे ढकलण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोरोना कोरोना विषाणूनंतर होणाऱ्या त्रासामुळे रमेश पोखरियाल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. २१ एप्रिल रोजी निशंक यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. 

रमेश पोखरियाल निशंक यांची आज सर्व राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांसोबत बैठक होती. यात सीबीएसई बारावीच्या परीक्षांबाबतच्या निर्णयाची शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक माहिती देणार होते. त्यापूर्वी या निर्णयाची त्यांना पंतप्रधानांनाही याबाबत माहिती द्यायची होती.

COVID-19: तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवर परिणाम होणार नाही; एम्सच्या संचालकांची...

राज्य, शिक्षण मंडळांकडून आतापर्यंत मिळालेल्या सूचनांच्या आधारे त्यांनी तयार केलेला अहवाल पंतप्रधानांना सादर करू शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बारावीची परीक्षा होणार आहे. यात 18 ते 20 महत्त्वाच्या विषयांची परीक्षा घेण्यात येण्याची शक्यता आहे. यामध्ये परीक्षा केंद्रांची संख्या दुप्पट केली जाईल.

परीक्षा केंद्रांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या उमेदवार, कर्मचारी, 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे असल्यास प्राधान्याने त्यांना लसी दिली जाईल. यासह परीक्षा केंद्रांवर कोविड प्रोटोकॉलची व्यवस्था असणार असून परीक्षा हॉलमधील परीक्षार्थींची संख्याही कमी करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या