'काँग्रेसच्या काळात ईशान्य भारतामध्ये केवळ भूमीपूजनच व्हायचं'

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 28 डिसेंबर 2020

ईशान्य भारतात कॉंग्रेसने बराच काळ राज्य केले, परंतु या काळात केवळ भूमीपूजनच झाले, विकासकामे कोठेच दिसले नाही, अशी टीका गृहमंत्री अमित शहा यांनी केली.

इंफाळ :  ईशान्य भारतात कॉंग्रेसने बराच काळ राज्य केले, परंतु या काळात केवळ भूमीपूजनच झाले, विकासकामे कोठेच दिसले नाही, अशी टीका गृहमंत्री अमित शहा यांनी केली. ते ईशान्य भारताच्या दौऱ्यावर असून आज ते इंफाळला आले. विविध विकास कामाच्या उद्घाटनानंतर आयोजित सभेत बोलताना अमित शहा यांनी कॉंग्रेसवर टीका केली. 

शहा म्हणाले, की कॉंग्रेसने ईशान्य भारतातील असंतुष्ट गटांशी कधीही चर्चा केली नाही. त्यामुळे या भागाच्या प्रश्‍नांवर कधीही तोडगा निघाला नाही. नागरिक अकारण मारले जात होते आणि विकासाचा थांगपत्ता नव्हता. विकासाच्या नावावर केवळ भूमिपूजन केले जात होते. परंतु आमच्या काळात केवळ भूमिपूजन नाही तर प्रकल्पाचे उद्घाटन देखील होत आहेत. ईशान्य भारताची ओळख आता बदलत चालली आहे. 

पूर्वी हिंसाचार आणि दहशतवादी घटनांमुळे ईशान्य भारताची प्रतिमा खराब झाली होती. राज्यात सातत्याने बंदचे आवाहन केले जात होते आणि विकास कामातही अडथळे आणले जात होते. परंतु गेल्या सहा महिन्यात दहशतवादी संघटनांनी प्रशासनासमोर शरणागती पत्करत आहेत. आगामी काळात हिंसाचाराच्या घटनांत आणखी घट होऊ शकते. स्थानिक नागरिकांनी मुख्य प्रवाहात येणे गरजेचे आहे, अशीही अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली.

संबंधित बातम्या