केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना कोरोनाची लागण

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री आणि भाजप नेते प्रकाश जावडेकर यांना देखील कोरोना संसर्गाची लागण झाली आहे.

देशभरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. सर्वसामान्यांपासून ते अगदी केंद्रीय मंत्र्यापर्यंत सर्वजण कोरोनाच्या विळख्यात अडकत आहेत. दरम्यान केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री आणि भाजप नेते प्रकाश जावडेकर यांना देखील कोरोना संसर्गाची लागण झाली आहे.

प्रकाश जावडेकर यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. मी कोरोना पॉझिटिव्ह आढळलो आहे. मागील दोन-तीन दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्यांनी कृपया स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी, अस जावडेकर यांनी म्हटलं आहे. (Union Minister Prakash Javadekar contracted corona)

जो बायडन यांना अदर पुनावाला यांची हात जोडून विनंती; ट्विट करत म्हणाले..

दरम्यान, ‘’ऑक्सीजन मिळवण्यासाठी केंद्र सरकार महाराष्ट्राला सहकार्य करणार आहे. महत्त्वाचा मुद्दा जे मनुष्यबळ टेस्टिंग ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि ट्रिटमेंटसाठी लागणार आहे. ते मनुष्य़बळ घेण्यासाठी नॅशनल हेल्थ मिशनमधून केंद्र सरकार पैसे देणार आहे. कारण, आम्ही असं मानतो हे राष्ट्रीय संकट आहे. सगळी राज्य आणि सगळी जनता आमचीच आहे. त्यामुळे जिथे परिस्थिती गंभीर आहे तिथे जास्त लक्ष आणि उपाय अशा स्वरुपाचं धोरण आहे.’’अशी माहिती जावडेकर यांनी 10 एप्रिल रोजी पुण्यातील आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दिली होती.

 

संबंधित बातम्या