केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020

हृदयविकाराने त्यांचे गूरुवारी दिल्लीमधील खासगी रूग्णालयात निधन झाले. पासवान हे लोकजनशक्ती पक्षाचे प्रमूख नेते होते. दलितांचे नेते म्हणून ते राजकीय वर्तूळात परिचित होते. २०१४पासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात मंत्री होते.

नवी दिल्ली- केंद्रीय ग्राहक कल्याण, अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांचे गुरूवारी रात्री अल्पशा आजारामुळे निधन झाले. वयाच्या ७४व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. पासवान यांचे पूत्र चिराग पासवान यांनी ट्विट करून त्यांच्या मृत्यूची माहिती दिली.

‘वडिलांच्या आठवणीत आपले लहानपणीचे छायाचित्र पोस्ट करत त्यांनी म्हटले की, 'बाबा आता तुम्ही या जगात नाहीत. पण तुम्ही कुठेही असलात तरी माझ्याबरोबर सदैव आहात, याची मला कल्र्पना आहे.'

हृदयविकाराने त्यांचे गूरुवारी दिल्लीमधील खासगी रूग्णालयात निधन झाले. पासवान हे लोकजनशक्ती पक्षाचे प्रमूख नेते होते. दलितांचे नेते म्हणून ते राजकीय वर्तूळात परिचित होते. २०१४पासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात मंत्री होते. तेथे त्यांनी ग्राहक कल्याण, अन्न पुरवठा अशी महत्वाची खाती सांभाळली.

दरम्यान, पंतप्रधान मोदी त्यांच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त करताना म्हणाले की,  ‘मला प्रचंड दु:ख झाले आहे. माझ्याकडे शब्द नाहीत.  आपल्या देशात आज पोकळी निर्माण झाली आहे. ती कधीच भरून काढता येण्यासारखी नाही. श्री रामविलास पासवानजी यांचे निधन हे माझे वैयक्तिक नुकसान आहे. मी एक मित्र, बहुमूल्य सहकारी आणि प्रत्येक गरीब माणसाला सन्मानाने जगणं सुनिश्चित करण्यासाठी अत्यंत उत्साही असलेला एक सहकारी गमावला आहे.

संबंधित बातम्या