केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांची टेरिटोरियल आर्मीमध्ये कॅप्टन म्हणून पदोन्नती

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मार्च 2021

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांची बुधवारी टेरिटोरियल आर्मीमध्ये कॅप्टन म्हणून पदोन्नती झाली आहे.

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांची बुधवारी टेरिटोरियल आर्मीमध्ये कॅप्टन म्हणून पदोन्नती झाली आहे. टेरिटोरियल आर्मीचे नियमित कमिशनर अधिकारी म्हणून नेमणूक होणारे ते पहिले केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री आहे. ते पहिले खासदार आणि मंत्री आहेत जे टेरिटोरियल आर्मीमध्ये नियमित कमिशनर अधिकारी म्हणून काम करणार आणि कॅप्टन म्हणून सेवा देणार आहे.

Good News: कोरोना लसीच्या किंमतीत घट: सर्वसामान्यांसाठी इतक्या होणार रूपयात उपलब्ध 

जुलै 2016 मध्ये लेफ्टनंट म्हणून त्यांना टेरिटोरियल आर्मीमध्ये कमिशन पद देण्यात आले होते. ट्विटरवर या कार्यक्रमाचा व्हिडिओ शेअर ठाकूर यांनी शेअर केला आहे. "जुलै 2016 मध्ये माझी टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट म्हणून नियुक्त करण्यात आली होती. मला कॅप्टनच्या पदावर बढती देण्यात आल्याची बातमी सांगतांना आज मला अभिमान वाटतो. मी जनतेची सेवा करण्यासाठी आणि मातृभूमीप्रती कर्तव्य करण्यासाठी नेहमीच वचनबद्ध आहे," असे कॅप्शन अनुराग ठाकूर यांनी सोशल मिडियावर शेअर केलेल्या व्हिडियोला दिले आहे.

डिलिव्हरी बॉयने बंगळुरुच्या महिलेचे आरोप फेटाळल्यावर झोमॅटोने दिली अधिकृत प्रतिक्रिया 

 

 

संबंधित बातम्या