बेशिस्त प्रवाशांना विमान प्रवास बंदी: देशासह गोव्यातही मार्गदर्शक प्रणाली जाहीर

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 31 मार्च 2021

केंद्रीय विमानोड्डाण मंत्रालयाने आज नवीन मार्गदर्शक तत्त्‍वे जारी केली आहे. केंद्रीय विमान उड्डाण खात्याचे मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ही तत्त्‍वे जारी केली आहे.

नवी दिल्ली: विमान प्रवास करताना मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग व अन्य नियम न पाळणाऱ्या बेशिस्त प्रवाशांसाठी मुलकी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए ) कठोर निर्बंधांचा व त्यांचे पालन न केल्यास प्रवास बंदीसह अन्य शिक्षांचा समावेश असलेले नवे दिशानिर्देश आज जारी केले. 

विमानोड्डाण मार्गदर्शक प्रणाली जाहीर

केंद्रीय विमानोड्डाण मंत्रालयाने आज नवीन मार्गदर्शक तत्त्‍वे जारी केली आहे. केंद्रीय विमान उड्डाण खात्याचे मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ही तत्त्‍वे जारी केली आहे. विमानतळावर कोरोना नियंत्रणासाठी ठरवण्यात आलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असून प्रवासी, सुरक्षाकर्मी, विमानाचे कर्मचारी तसेच अधिकारी या सर्वांनी तोंडाला मास्क लावणे, सुरक्षित अंतर ठेवणे सक्तीचे केले आहे.

चीन संघर्षानंतर सेनाप्रमुख जनरल नरवणे यांचे मोठे वक्तव्य 

महाराष्ट्रासह देशाच्या किमान सहा राज्यांत कोरोनाचा पुन्हा विस्फोट होण्याच्या सद्यःस्थितीत वारंवार इशारे देऊनही अनेक विमान प्रवासी कोविड निर्बंधांचे पालन योग्य प्रकारे करत नसल्याच्या वाढत्या तक्रारी येऊ लागल्यावर डीजीसीएने हे दिशानिर्देश जारी केले. देशभरातील विमानतळांची प्रशासने, विमान कंपन्या आदींनाही याबाबत कडक काळजी घेण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. सर्व प्रवाशांनी व्यवस्थितपणे मास्क लावले आहेत की नाही, विमानतळ परिसरात सोशल डिस्टन्सिंग पाळले जात आहे का नाही हे काटेकोरपणे पाहण्याची जबाबदारी या यंत्रणांची असेल. कोणत्याही विमानात अचानक जाऊन तपासणी करण्याचेही अधिकार विमानतळ प्राधिकरण अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

टाटा सन्सशी झालेल्या वादाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाबद्दल सायरस मिस्त्री यांनी निराशा व्यक्त केली आहे..

बेशिस्त प्रवाशांवर दंड व वारंवार बेजबाबदारपणे वागणाऱ्या प्रवाशांवर पहिल्या टप्प्यात तीन महिने प्रवासबंदी लादणे या सक्तीच्या उपायांचा समावेश आहे. विमान कर्मचाऱ्यांच्या नम्र विनंतीला त्यांच्यावर हल्ला करून, त्यांच्या अंगावर धावून जाऊन, शिवीगाळ करून प्रत्युत्तर देणाऱ्या असभ्य प्रवाशांच्या संगणकीय नोंदीतील नावाला अनियंत्रित किंवा बेकाबू प्रवासी असा शेरा मारून तो डीजीसीएच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून साऱ्या विमान कंपन्यांपर्यंत पोहोचविला जाईल व त्याच्यावर प्रवासबंदी कारवाई तत्काळ झाली की नाही यावरही डीजीसीए यंत्रणा काटेकोर लक्ष ठेवेल.

प्रमुख दिशानिर्देश 

  • आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करणेआवश्‍यक
  • विमानतळ परिसरात प्रवेश करतानाही प्रत्येक प्रवाशाच्या शरीराचे तापमान मोजण्यात यावे
  • शरीराचे तापमान जास्त असेल त्यांना बोर्डींग पास देण्याआधी त्यांची जागेवरच कोरोना चाचणी करणे अनिवार्य
  • संपूर्ण प्रवासात मास्क व्यवस्थित लावणे सक्तीचे
  • एकापेक्षा जास्त राज्यातून विमान जाणार असेल तर प्रत्येक राज्यातही संबंधित विमानतळ
  • अधिकाऱ्यांनी मागितला तर कोरोना आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल सादर करावा लागू शकतो
  • विमान थांबताच सर्वांनी कदम उठून बाहेर पडण्याची घाई करण्यास सक्त मनाई
  • प्रत्येक रांगेतील प्रवाशांसाठी घोषणा झाली की त्याच रांगेतील प्रवाशांना उठून बाहेर पडण्यास परवानगी
  • विमान कंपन्या प्रवाशांवर हल्ला करणाऱ्यांना सहा महिन्यांसाठी व कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण करणाऱ्यांना किमान 2 वर्षांसाठी प्रवासबंदी लावण्याची तरतूद

संबंधित बातम्या