UP Assembly Verdict: कोर्ट बनली विधानसभा! 6 पोलिसांना 1 दिवसाची शिक्षा, आमदाराच्या मारहाणीचा...

MLA Salil Vishnoi: आज यूपी विधानसभेने न्यायालयासारखे काम केले आणि सीओसह 6 पोलिसांना एक दिवसाच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
UP Assembly
UP Assembly Dainik Gomantak

MLA Salil Vishnoi Beating Case: यूपी विधानसभेत आज ऐतिहासिक दृश्य पाहायला मिळाले. खरे तर, आज यूपी विधानसभेने न्यायालयासारखे काम केले आणि सीओसह 6 पोलिसांना एक दिवसाच्या कारावासाची शिक्षा सुनावली. या पोलिसांनी 19 वर्षापूर्वी भाजप आमदार सलील विश्नोई यांना मारहाण केल्याप्रकरणी यूपी विधानसभेने शिक्षा सुनावली आहे.

दरम्यान, सीओसह 6 पोलिस विशेषाधिकार भंगप्रकरणी दोषी आढळले आहेत. यूपी विधानसभेच्या या निर्णयाला विधानसभेत आव्हान देता येणार नाही. शिक्षेच्या आदेशानुसार दोषी पोलिसांना (Police) कैद्यांसाठी विधानसभेतच बनवलेल्या विशेष कक्षात ठेवण्यात येणार आहे. दोषी पोलिस कर्मचारी मध्यरात्री 12 पर्यंत बंद राहणार आहेत.

आमदार मारहाण प्रकरणी मोठा निर्णय

आज विधानसभेत 19 वर्षांच्या आमदाराला मारहाण प्रकरणाची सुनावणी झाली. संसदीय कामकाज मंत्री सुरेश खन्ना यांनी 2004 मधील घटनेसाठी जबाबदार असलेल्या पोलिसांच्या विशेषाधिकाराच्या उल्लंघनाबाबत एक प्रस्ताव मांडला. तब्बल 19 वर्षांनंतर या पोलिसांवर कारवाई करण्यात आली.

विशेषाधिकार भंग केल्याप्रकरणी पोलीस कर्मचारी दोषी

या प्रकरणात भाजप (BJP) आमदार सलील विश्नोई यांना मारहाण करणारे कानपूरचे तत्कालीन सीओ अब्दुल यांच्यासह 6 पोलिसांना विशेषाधिकार भंगाचा दोषी ठरवण्यात आले होते. सभागृहाच्या या निर्णयाला उच्च न्यायालयातही आव्हान देता येणार नाही.

हा प्रस्ताव सभागृहात ठेवला

संसदीय कामकाज मंत्री सुरेश खन्ना यांनी उत्तर प्रदेश विधानसभेत प्रस्ताव मांडला की, एक दिवसासाठी म्हणजे आज रात्री 12 वाजेपर्यंत दोषी पोलिसांना तुरुंगात टाकावे. त्यानंतर आवाजी मतदानाने हा प्रस्ताव आमदारांनी मंजूर केला. मात्र, सपाच्या आमदारांनी सभागृहातून सभात्याग केला. त्यांच्या अनुपस्थितीत हा ठराव मंजूर करण्यात आला.

यावेळी, विधानसभा अध्यक्ष सतीश महाना म्हणाले की, सभागृहाचा निर्णय महत्त्वाचा असतो. आपले संविधान ही आपली जीवनरेखा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com