Azam Khan यांचे पुत्र अब्दुल्ला खान यांना आणखी एक झटका! भाजप आमदाराच्या तक्रारीवर मोठी कारवाई

Abdullah Azam Khan: समाजवादी पक्षाचे दिग्गज नेते आझम खान यांचे पुत्र अब्दुल्ला आझम खान यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
Azam Khan & Abdullah Khan
Azam Khan & Abdullah Khan Dainik Gomantak

Abdullah Azam Khan Latest News: समाजवादी पक्षाचे दिग्गज नेते आझम खान यांचे पुत्र अब्दुल्ला आझम खान यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. नुकतेच अब्दुल्ला आझम खान यांची आमदारकी हिरावण्यात आली, आता त्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले आहे. भाजप आमदार आकाश सक्सेना यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, अब्दुल्ला आझम खान हे रामपूर जिल्ह्यातील स्वार विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते, परंतु एका प्रकरणात दोषी ठरल्यानंतर त्यांचे विधानसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते.

15 वर्षे जुन्या प्रकरणात अब्दुल्ला आझम खान यांना मुरादाबाद येथील न्यायालयाने (Court) दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असून आता त्यांचे नाव मतदार यादीतूनही काढून टाकण्यात आले आहे.

Azam Khan & Abdullah Khan
Abdullah Azam Khan: आझम खान यांचे पुत्र अब्दुल्ला खान यांना मोठा झटका, आमदारकी हिरावली

अब्दुल्ला यांचे नाव मतदार यादीतून वगळले

रामपूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक नोंदणी अधिकाऱ्याने सांगितले की, रामपूरचे भारतीय जनता पक्षाचे आमदार आकाश सक्सेना यांच्या तक्रारीवरुन हा निर्णय घेण्यात आला आहे. अब्दुल्ला आझम खान यांचे नाव मतदार यादीतून वगळण्याची मागणी भाजप (BJP) आमदाराने केली होती.

भाजप आमदाराने तक्रार केली

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लोकप्रतिनिधी कायद्यानुसार अब्दुल्ला आझम खान यांचे सदस्यत्व संपल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या आधारे अब्दुल्ला यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात यावे. बुधवारी, यूपी विधानसभेने आझम खान यांचे पुत्र अब्दुल्ला आझम खान यांना विधानसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरवले.

Azam Khan & Abdullah Khan
Azam Khan: 15 वर्षे जुन्या प्रकरणात आझम खान यांना दोन वर्षांची शिक्षा

2 वर्षांची शिक्षा

उत्तर प्रदेश विधानसभेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 15 वर्षे जुन्या प्रकरणात अब्दुल्ला आझम खान यांना अलीकडेच 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यानंतर त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले. त्यांची जागा 13 फेब्रुवारीपासून रिक्त घोषित करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, अब्दुल्ला आझम खान यांना अपात्र घोषित करण्याची ही दुसरी वेळ आहे. 2020 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने अब्दुल्ला यांची यूपी विधानसभेची निवडणूक रद्द केल्यानंतर त्यांना अपात्र ठरवण्यात आले. त्यांची यापूर्वीची अपात्रता 16 डिसेंबर 2019 पासून लागू झाली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com