लग्नपत्रिका वाटताना केले मुलीचे अपहरण, सामूहिक बलात्कार करून विकले झांसीत

ती तिच्या लग्नासाठी निमंत्रण पत्रिका वाटण्यासाठी जात होती आणि नराधमांनी साधली संधी
UP woman kidnapped while distributing her wedding cards gang raped and sold in Jhansi
UP woman kidnapped while distributing her wedding cards gang raped and sold in Jhansi Dainik Gomantak

दिवसेंदिवस बलत्काराच्या घटना वाढत आहे. रात्री सोडा दिवसाही महिला सुरक्षीत नसल्याचे उदाहरण पुन्हा एकदा समोर आले आहे. उत्तर प्रदेशातील (UP) 18 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर तिन नराधमांनी बलात्कार केल्याची घडना घडली आहे. ती तिच्या लग्नासाठी निमंत्रण पत्रिका वाटण्यासाठी जात असताना तिचे अपहरण करण्यात आले. आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला. झाशी जिल्ह्यात तीन नराधमांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा खळबळजनक आरोप पिडीत मुलीने केला आहे. (UP woman Rape Case)

UP woman kidnapped while distributing her wedding cards gang raped and sold in Jhansi
ओडिशाच्या दिशेने सरकले चक्रीवादळ, आंध्रामध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस, किनारी भाग रिकामा

महिलेने असाही आरोप केला आहे की, आरोपीने तिला एका राजकीय पक्षाच्या नेत्याकडे नेले आणि नंतर मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यातील शेजारच्या गावात तिला एका अनोळखी व्यक्ती सोबत राहण्यास भाग पाडले, पोलिसांना दिलेल्या तक्रारीत महिलेने आरोप केला आहे की, ती 21 एप्रिल रोजी होणाऱ्या लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी 18 एप्रिल रोजी बाहेर जात होती दरम्यान गावातील तीन तरुणांनी तिचे अपहरण केले, अशी माहिती घटनेचा तपास करत असणाऱ्या पोलिसांनी दिली आहे.

त्यांनी तिला काही दिवस वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले आणि नंतर तिला एका नेत्याकडे सोपवले, ज्याने तिला आणखी काही दिवस झाशीत ठेवले, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यानंतर महिलेला तिच्या इच्छेविरुद्ध दुस-यासोबत राहण्यासाठी मध्य प्रदेशातील दतिया येथील गावात पाठवण्यात आले आणि तेथे तिच्या सोबत जबरदस्ती करण्यात आली.

UP woman kidnapped while distributing her wedding cards gang raped and sold in Jhansi
पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर, जाणून घ्या आजचे इंधनाचे दर

महिलेने काही लोकांविरुद्ध तिचे अपहरण, बलात्कार आणि विक्री केल्याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि दंडाधिकार्‍यांसमोर तिची जबानी नोंदवण्यात आली आहे, अशई माहिती तेहरौली मंडल अधिकारी (CO) अनुज सिंह यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com