UPSC 2021 चा निकाल जाहीर; श्रुती शर्मा देशात पहिली

या वर्षी पाहिले तीन क्रमांक मुलींनी मिळवले आहेत.
Shruti Sharma
Shruti Sharma Dainik Gomantak

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) UPSC नागरी सेवा परीक्षा (Civil service exam) 2021 चा अंतिम निकाल आज 30 मे रोजी जाहीर केला आहे. उमेदवार त्यांचे संबंधित निकाल अधिकृत वेबसाइट — upsc.gov.in वरून पाहू शकतात.

Shruti Sharma
देश 2014 पूर्वी ज्या दुष्टचक्रात अडकला होता त्यातून बाहेर पडत आहे; पंतप्रधान मोदी

आज जाहीर झालेल्या अंतिम निकालात श्रुती शर्माने ऑल इंडिया रँक 1 मिळवला आहे. या वर्षी पाहिले तीन क्रमांक मुलींनी मिळवले आहेत. श्रुती सेंट स्टीफन्स कॉलेज आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची माजी विद्यार्थिनी आहे आणि ती जामिया मिलिया इस्लामिया निवासी कोचिंग अकादमीमध्ये UPSC नागरी सेवा परीक्षेची तयारी करत होती.

Shruti Sharma
भाजप-काँग्रेसने जाहीर केली राज्यसभा उमेदवारांची यादी, अशी ठरली रणनीती

UPSC CSE प्राथमिक परीक्षा 10 ऑक्टोबर 2021 रोजी झाली आणि परीक्षेचा निकाल 29 ऑक्टोबर रोजी जाहीर झाला. मुख्य परीक्षा 7 ते 16 जानेवारी 2022 या कालावधीत घेण्यात आली आणि निकाल 17 मार्च 2022 रोजी घोषित करण्यात आला. 5 एप्रिलपासून सुरू झालेल्या आणि 26 मे रोजी संपलेल्या परीक्षेची मुलाखत ही शेवटची फेरी होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com