राखीव यादीतून ‘यूपीएससी’कडून ८९ जणांची नावे जाहीर

दैनिक गोमन्तक
बुधवार, 6 जानेवारी 2021

केंद्रीय लोकसेवा आयोगाने राखीव यादीतून ८९ जणांची नावे सोमवारी जाहीर केली. यात लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची द्वितीय कन्या अंजली यांची निवड करण्यात आली.

नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगाने राखीव यादीतून ८९ जणांची नावे सोमवारी जाहीर केली. यात लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची द्वितीय कन्या अंजली यांची निवड करण्यात आली. नवी दिल्लीतील रामजस महाविद्यालयातून त्यांनी राज्यशास्त्राची पदवी प्राप्त केली आहे. त्या २०१९ च्या प्रशासकीय सेवेच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाल्या आहेत.

२०१९ रोजी घेतलेल्या नागरी सेवेच्या परीक्षेचा निकाल ४ ऑगस्ट २०२० रोजी जाहीर केला होता. यानुसार ९२७ रिक्त जागेपैकी ८२९ जणांच्या गुणवत्तेच्या आधारावर आयएएस, आयएफएस, आयपीएस आणि अन्य गटाचे अ आणि 
ब गटातील नियुक्त्या करण्यात आल्या.  

आणखी वाचा:

लोकांचे प्राण आणि रोजीरोटी वाचविणे हेच सर्वांत मोठे काम -

संबंधित बातम्या