यूपीएससी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

Dainik Gomantak
शनिवार, 6 जून 2020

मुख्य परीक्षा नवीन वर्षात

मुंबई

कोरोना संसर्गामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) पूर्व आणि मुख्य परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. शुक्रवारी आयोगाने पूर्व आणि मुख्य परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार मुख्य परीक्षा 8 जानेवारी 2021 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
आयोगाने पुढे ढकललेल्या परीक्षांसाठी नवीन वेळापत्रक यूपीएससीच्या संकेतस्थळावर जाहीर केल्या आहेत. सिव्हिल सर्व्हिसेस पूर्व परीक्षा जी आधी 31 मे रोजी नियोजित होती. ती लॉकडाऊनमुळे स्थगित करण्यात आली होती. नव्या वेळापत्रकानुसार सिव्हिल सर्व्हिसेस पूर्व परीक्षा 4 ऑक्‍टोबर 2020 रोजी, तर मुख्य परीक्षा 8 जानेवारी 2021 रोजी होणार आहे. शिवाय 2019 च्या परीक्षेमध्ये मुलाखतीचा टप्पा कोरोनामुळे अपूर्ण राहिला होता. ज्या उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण होऊ शकल्या नव्हत्या, त्या 20 जुलै 2020 पासून सुरू होणार आहेत. त्याबाबत उमेदवारांना वैयक्तिक पत्राद्वारे तारीख कळवली जाईल. एनडीएची परीक्षा 6 सप्टेंबर 2020 रोजी होणार आहे. केंद्रीय सुरक्षा पोलिस दलाच्या परीक्षेसाठी 18 ऑगस्ट 2020 पासून नोंदणी सुरू होणार असून 20 डिसेंबर 2020 रोजी परीक्षा होईल. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसची परीक्षा 28 फेब्रुवारी 2021 रोजी होणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
यूपीएससीच्या वर्षभराच्या परीक्षांचे वेळापत्रक आधीच जाहीर होत असते. यावेळी कोरोनाच्या संकटामुळे परीक्षेचे वेळापत्रक विस्कळित झाले होते. पण आज आयोगाने नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. अर्थात परिस्थिती अगदीच हाताबाहेर गेल्यास या परीक्षांच्या तारखेत थोडाफार बदल होऊ शकतो, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या