यूपीएससी पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर

गोमंतक वृत्तसंस्था
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) घेण्यात आलेल्या सिव्हिल सर्व्हिसेस पूर्व परीक्षा 2020 चा निकाल जाहीर काल केला आहे. 

नवी दिल्ली:  केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) घेण्यात आलेल्या सिव्हिल सर्व्हिसेस पूर्व परीक्षा 2020 चा निकाल जाहीर काल केला आहे. 
 हा निकाल अधिकृत वेबसाईट upsc.gov.in आणि upsconline.nic.in वर पाहता येऊ शकतो.

दरम्यान, आयोगाने यूपीएससी सीएस पूर्व परीक्षा 2020 परीक्षेसह भारतीय वन सेवा (पूर्व) परीक्षा 2020 चा देखील निकाल जाहीर केला आहे. परीक्षेच्या नियमांनुसार जे विद्यार्थी या पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झाले 
आहेत, त्यांचा निकाल घोषित केला आहे. 

पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षा 8 जानेवारी 2021 रोजी होणार आहे. यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस मुख्य परीक्षा 2020 साठीचे अॅडमिट कार्ड आणि परीक्षेचे वेळापत्रक परीक्षेच्या आधी 3-4 आठवडे येणार आहे. विद्यार्थ्यांनी आपला पत्ता, मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी बदलला असेल तर तशी माहिती आयोगाकडे देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षेची अन्सर की, मार्क्स आणि कट ऑफ मार्क्सची पूर्ण माहिती यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षा 2020 चा अंतिम निकाल लागल्यानंतर देणार आहे.

संबंधित बातम्या