स्वदेशी संरक्षण उत्पादनांमध्ये 75 टक्के परदेशी सामग्रीचा वापर

दैनिक गोमंतक
सोमवार, 12 एप्रिल 2021

'मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत' अंतर्गत देशात संरक्षण उत्पादनांची गती वाढताना दिसते आहे, मात्र आजही संरक्षण खात्याशी संबंधित सामग्री तयार करण्यासाठी  परदेशातून मोठ्या प्रमाणात आयात केली जात असल्याचे पाहायला मिळते आहे.

'मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत' अंतर्गत देशात संरक्षण उत्पादनांची गती वाढताना दिसते आहे, मात्र आजही संरक्षण खात्याशी संबंधित सामग्री तयार करण्यासाठी  परदेशातून मोठ्या प्रमाणात आयात केली जात असल्याचे पाहायला मिळते आहे. संरक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, जहाजांची निर्मिती मधील 75 टक्के आणि विमानांच्या निर्मितीतील 60 टक्के घटकांची परदेशातून आयात केली जाते. यामुळे देशात तयार होणाऱ्या संरक्षण उपकरणांच्या माध्यमातून  मोठी रक्कम परदेशी कंपन्यांकडे जात असल्याचे जात असल्याचे  मिळते आहे. (use of foreign materials up to 75% in domestic defense products)

देशातील लसीकरण सुरळीत करण्यासाठी रेमडेसीवीर लसीची निर्यात थांबण्याचा केंद्र...

संरक्षण मंत्रालयाच्या (Defence Ministry) म्हणण्यानुसार युद्धनौका निर्माण करणार्‍या सार्वजनिक संरक्षण कंपनी एमडीएलच्या प्रोजेक्ट 15 बी आणि एमडीएलच्या 17 ए जहाजांच्या निर्मितीमध्ये 72-75 टक्के परदेशी घटकांचा उपयोग केला जातो आहे. 2024-25 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असणाऱ्या या प्रकल्पा अंतर्गत अनेक जहाजे तयार केली जाणार आहेत. स्वदेशी उत्पादनांमध्ये सर्वात जास्त आयात या घटकात केली जात असल्याचे समजते आहे. त्याचप्रमाणे तेजस लढाऊ विमानासह इतर विमानांची निर्मिती करणारी हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) 40 ते 60 टक्के परदेशी घटक वापरत आहेत. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सुखोई -30 एमकेआयपैकी 40%, तेजसमध्ये 43, एएलएचमध्ये 44 आणि डीओ -228 विमानातील 60% भाग परदेशातून आयात केले जातात.

इलेक्ट्रॉनिक युद्ध उपकरणांमध्ये (Defence Products) देखील अशीच परिस्थिती असल्याचे पाहायला मिळते आहे. रडार, संप्रेषण आणि इलेक्ट्रॉनिक युद्धाची उपकरणे तयार करणार्‍या सार्वजनिक क्षेत्रातील बीईएलने गेल्या तीन वर्षात 22 ते 27 टक्के विदेशी घटकांचा वापर केला आहे. बीईएमएलमध्ये परदेशी घटकांच्या वापराचे प्रमाण 18 ते 20 टक्के असून, जीएसएलमध्ये 25 टक्के, हिंदुस्तान शिपयार्डमध्ये 21 टक्के तर जीआरएसई उत्पादनांमध्ये 10% परदेशी (Imported Content) घटक वापरले जात आहेत.

संबंधित बातम्या