Sanatan Dharma हा ‘भारताचा राष्ट्रीय धर्म’, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांचे विधान

Udhayanidhi Stalin यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांच्या पार्श्वभूमीवर भाजप सातत्याने विरोधी पक्षांची आघाडी सनातन धर्मविरोधी असल्याचा आरोप करत आहे.
Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath Says Sanatan Dharma Is India's Rashtriya Dharma
Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath Says Sanatan Dharma Is India's Rashtriya DharmaDainik Gomantak

Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath Says Sanatan Dharma Is India's Rashtriya Dharma:

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मध्य प्रदेशातील एका कार्यक्रमात नुकतेच, सनातन धर्माबाबतच्या वादग्रस्त विधानांदरम्यान सनातन धर्माला भारताचा राष्ट्रीय धर्म घोषित केला आहे.

मुख्यमंत्री योगी यांनी इंदूरमध्ये सांगितले की, या धर्मावर याआधीही हल्ले झाले आहेत, पण याला कोणीही नष्ट करू शकणार नाही.

तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचे पुत्र आणि राज्याचे युवक कल्याण मंत्री उदयनिधी स्टॅलिन आणि माजी केंद्रीय मंत्री ए. राजासारख्या द्रमुक नेत्यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांच्या पार्श्वभूमीवर भाजप सातत्याने विरोधी पक्षांची आघाडी सनातन धर्मविरोधी असल्याचा आरोप करत आहे.

“सनातन धर्म शाश्वत आहे. त्याच्या शाश्वततेबद्दल कोणीही प्रश्न उपस्थित करू शकत नाही. सनातन धर्म हा भारताचा राष्ट्रीय धर्म आहे,” असे इंदूर येथील श्रीनाथ मंदिरात ध्वजस्तंभाच्या अनावरण समारंभात आदित्यनाथ म्हणाले.

"जेव्हा भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशातील मुस्लिम हजसाठी मक्केला जातात, तेव्हा त्यांना सौदी अरेबियात हिंदू म्हणून संबोधले जाते कारण हा शब्द जातीशी संबंधित नसून भारताच्या सांस्कृतिक अभिवादनाचे लक्षण आहे," असे अदित्यनाथ म्हणाले.

Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath Says Sanatan Dharma Is India's Rashtriya Dharma
बहीण 'कुटुंबाचा' भाग नसते, मृत भावाच्या जागी नोकरी मिळू शकत नाही: हायकोर्टाचा निर्णय

द्रमुक नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्माविषयीच्या टिप्पण्यांवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ म्हणाले: “काही लोक आहेत जे सनातन धर्माला शिव्या देत आहेत. भारतात राहूनही ते भारताच्या मूल्यांवर, तत्त्वांवर आणि आदर्शांवर हल्ला करायला मागेपुढे पाहत नाहीत. देवाचे अस्तित्व नाकारण्याची ही पहिलीच वेळ नाही.”

Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath Says Sanatan Dharma Is India's Rashtriya Dharma
"देख रहा है ना बिनोद," iPhone 15 लॉंच होताच ट्विटरवर मीम्सचा धुरळा

दोन श्लोकांचा संदर्भ देत योगी अदित्यनाथ म्हणाले की, "जो कोणी हिंदुस्थानात राहतो त्याला हिंदू म्हणतात. जे लोक पुराण आणि भारताची मौलिकता या संकल्पना पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत ते इतिहास आणि वर्तमानाला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत."

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे कौतुक करताना ते म्हणाले, “ब्रिटनच्या पंतप्रधानांचे पूर्वज तीन पिढ्यांपूर्वी स्थलांतरित झाले होते. ते अजूनही अभिमानाने सांगतात की ते हिंदू आहेत.”

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com