लखनऊ एसटीएफ पोलिसांनी उधळला घातपाताचा मोठा कट  

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

लखनऊच्या एसटीएफ पोलिसांनी द पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेच्या दोघाजणांना अटक केली आहे.

लखनऊच्या एसटीएफ पोलिसांनी द पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेच्या दोघाजणांना अटक केली आहे. वसंत पंचमीच्या दिवशी या दोघांनी राजधानीसह देशातील मोठ्या शहरांमध्ये घातपात घडवण्याचा मोठा कट रचला होता, अशी माहिती पोलिसांनी आज पत्रकार परिषदेत दिली. तसेच त्यांच्याकडून उच्च प्रतीची स्फोटक सामग्री, एक्सप्लोझिव्ह आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय अटक करण्यात आलेले दोघेही केरळचे असल्याचे एसटीएफ अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. 

टूलकिट प्रकरणी निकिता जेकबचा मोठा खुलासा; न्यायालयाने जामीनासाठीच्या याचिकेवरचा...

पीएफआयच्या या दोन दहशतवाद्यांकडून 16 उच्च प्रतीची स्फोटके, एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस, बॅटरी डिटोनेटर, लाल रंगाच्या वायरची केबल, एक पिस्तूल, सात काडतुसे, 4800 रुपये, पॅन कार्ड, चार एटीएम, दोन डीएल, मेट्रो कार्ड, 12 रेल्वे तिकिटे जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या काही दिवसांपासून यांचा माग घेण्यात येत असल्याचे एसटीएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर काही नेते होते, असा गंभीर खुलासा पोलिसांनी केला आहे. 

दरम्यान, नागरिकता दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणीच्या (एनआरसी) निषेधाच्या वेळी उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या हिंसाचारात पीएफआयचा हात असल्याचे पोलिसांनी म्हटले होते. त्यानंतर, एन्फोर्समेंट डायरेक्टरेट (ईडी) तपास एजन्सीच्या म्हणण्यानुसार पीएफआयने प्रदर्शनाच्या वेळेस 130 कोटी रुपये जमा केले होते. मात्र ईडीकडून करण्यात आलेले दावे पीएफआयने फेटाळले होते. याशिवाय सीएएच्या विरोधात लखनऊ मध्ये झालेल्या हिंसेप्रकरणी पीएफआयच्या तीन सदस्यांना अटक करण्यात आली होती.  

संबंधित बातम्या