उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांना कोरोनाची लागण
CM

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांना कोरोनाची लागण

उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांना कोणाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री रावत यांनी सोशल मीडियावरील ट्विटरवर स्वतःच ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. या ट्विट मध्ये तीरथ सिंह रावत यांनी, 'माझा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला असून, मी ठीक आहे आणि मला कोणताही त्रास नाही. शिवाय मी डॉक्टरांच्या देखरेखीखाली स्वत: ला क्वारंटाईन केले आहे. व तुमच्यातील जे काही लोक गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आले होते. त्यांनी कृपया सावध रहा आणि स्वतःची कोरोना तपासणी करून घ्या,'' असे म्हटले आहे. 

जनता कर्फ्यूला एक वर्ष; नियमांकडे दुर्लक्ष, कोरोनाचा पुन्हा उद्रेक
 
उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत नुकतेच कुंभमध्ये गेले होते. यावेळी ते संतांसह पूजेमध्ये सहभागी झाले होते. तर रविवारीही त्यांनी काही क्रीडा कार्यक्रमात भाग घेतला होता. याशिवाय, उत्तराखंडमध्ये होणाऱ्या कुंभमेळाव्यात कोरोनाच्या खबरदारीसाठी म्हणून लागू करण्यात आलेल्या नियमांमध्ये त्यांनी शिथिलता आणण्याच्या निर्णय घेतला होता. या दिवसात उत्तराखंडमध्ये कुंभमेळावा आयोजित करण्यात येतो. व कुंभमेळाव्याची सुरवात शाही स्नानाने होते, परंतु याचवेळेस देशात कोरोनाचे संकट पुन्हा वाढू लागले आहे. आणि त्यामुळे केंद्र सरकारने उत्तराखंड सरकारला कोरोना नियमांबाबतच्या सुचनांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.  

मात्र, तीरथसिंह रावत यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हाच त्यांनी प्रथम कुंभमेळाव्यातील कठोर नियम शिथिल करण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्याचबरोबर कुंभमेळाव्यातील प्रवेशाबाबत कोरोना निगेटिव्ह अहवालाची अनिवार्यता देखील त्यांनी दूर केली होती. दरम्यान, उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून तिरथसिंह रावत सतत चर्चेत राहिले आहेत. महिलांच्या वेषभूषेविषयी विधान असो किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भगवान रामशी तुलना करायची असो, मुख्यमंत्री रावत यांचे वक्तव्ये सतत खूपच चर्चेत राहिले आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com