भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी केलं वादग्रस्त वक्तव्य अन फाटक्या जीन्स आल्या ट्रेंडमध्ये  

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 18 मार्च 2021

फाटलेली जीन्स घालण्याची फॅशन ही आजच्या तरुण-तरुणींसाठी साठी फार विशेष गोष्ट राहिलेली नाही. तसेच फाटलेल्या जीन्स घालण्यावरून तरुणांना नावं  ठेवणं सुद्धा नवं नाही. मात्र या विषयावर जर एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री बोलत असतील तर हा चर्चेचा विषय ठरतो.

फाटलेली जीन्स घालण्याची फॅशन ही आजच्या तरुण-तरुणींसाठी साठी फार विशेष गोष्ट राहिलेली नाही. तसेच फाटलेल्या जीन्स घालण्यावरून तरुणांना नावं  ठेवणं सुद्धा नवं नाही. मात्र या विषयावर जर एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री बोलत असतील तर हा चर्चेचा विषय ठरतो. उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तिरथसिंह रावत यांनी महिलांच्या फाटलेल्या जीन्स घालण्याच्या फॅशन वरून टीका केली. आणि आता हा मुद्दा पुन्हा देशभरात चर्चेला आला. (Uttarakhand Chief Minister Tirath Singh Rawat's statement is criticized)  

महिलांनी कसे कपडे घालावे, महिलांनी कसे वागावे या बद्दलचे सल्ले देणारी अनेक मतं आपल्याला ऐकायला मिळतात. बलात्कार प्रकरणानंतर सुद्धा महिलांच्या राहणीमानावर प्रश्न उपस्थित केले जातात. त्यानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथसिंह रावत यांनी सुद्धा असाच एक किस्सा सांगताना सांगितले कि,"मी विमानातून प्रवास करत असताना एक महिला माझ्या बाजूला बसलेली होती. व त्या महिलेने पायात गम बूट (मोठ्या आकाराचे उंच बूट) घातलेले होते. मात्र वर पहिले तर त्या महिलेची जिन्स पायावर फाटलेली होती. ती महिला एक स्वयंसेवी संस्था चालवते, ज्यावेळी ती फाटलेली जीन्स घालून समाजात जात असेल तेव्हा समाज काय आदर्श घेईल ?" मुख्यमंत्री (Tirath Singh Rawat) तिरथसिंह रावत यांनी केलेल्या या विधानावरून फाटलेली जीन्स घातलेली महिला ही मुलांना आणि समाजाला काय आदर्श देईल असेच त्यांना म्हणायचे होते. मात्र आता त्यांच्या या वक्तव्यावरून देशातील अनेकांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.    

चालकांनो सावधान! टोल भरताना फास्टॅग नसल्यास दाखल होणार गुन्हा

(Uttarakhand Chief Minister Tirath Singh Rawat's statement is criticized) या प्रकणावर देशभरातून उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथसिंग रावत यांच्या विरोधात टीका होत असताना, अभिनेता वीर दास याने एक बोलके मिम आपल्या सोशल मीडियाच्या ट्विटर अकाउंट वरून ट्विट केले आहे. ज्यामध्ये त्याने फाटक्या जीन्स बद्दल महिलांवर टीका करणाऱ्या मानसिकतेचा समाचार घेतला आहे. हे ट्विट प्रचंड व्हायरल झाले असून सोशल मीडियावर हा विषय सगळ्यात जास्त चर्चिला जात आहे. 

त्यानंतर भूमिका छेडा यांनीही या प्रकरणी ट्विट केलं आहे. या ट्विट मध्ये त्यांनी गुडघ्यावर फाटलेली जीन्स घालून एक फोटो टाकून त्यावर लिहिले आहे की, फाटलेली जीन्स ही फाटलेल्या मेंदू पेक्षा कधीही उत्तम आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ट्विटर अकाउंट वरून सुद्धा समाज को क्या हनिकारक है. फटी जीन्स या घटी सोच..? असा प्रश्न करत उत्तराखंडचे मुख्यमंत्री रावत यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे.

एकूणच, वेगवेगळ्या ट्विट मधून फाटलेल्या जीन्स पेक्षा बुरसटलेली मानसिकताच समाजाला जास्त घातक असल्याचे मत सोशल मीडियावर व्यक्त करण्यात येत असल्याचे दिसते. (Uttarakhand Chief Minister Tirath Singh Rawat's statement is criticized)

संबंधित बातम्या