Uttarakhand Congress: गोव्यानंतर उत्तराखंडमध्ये काँग्रेसला धक्का! 3 नेत्यांनी सोडला पक्ष

Uttarakhand Congress News: उत्तराखंडमध्ये काँग्रेसला एकाच दिवसात तीन धक्के बसले आहेत.
Uttarakhand Congress Crisis News |Uttarakhand Congress News Update
Uttarakhand Congress Crisis News |Uttarakhand Congress News Update Dainik Gomantak

गोव्यानंतर (Goa) उत्तराखंडमध्ये काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. खरं तर, उत्तराखंड काँग्रेसच्या 3 बड्या नेत्यांनी एकाच दिवसात पक्ष सोडून आम आदमी पार्टीमध्ये (APP) प्रवेश केला आहे. राजेंद्र प्रसाद रातुरी, कमलेश रमण आणि कुलदीप चौधरी यांनी सोमवारी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. उत्तराखंड काँग्रेसचे (Uttarakhand Congress) प्रवक्ते राजेंद्र प्रसाद रातुरी, पक्षाचे सोशल मीडिया सल्लागार कुलदीप चौधरी आणि राज्य महिला काँग्रेसचे उपाध्यक्ष कमलेश रमण यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या उपस्थितीत आम आदमी पक्षात प्रवेश केला. उत्तराखंड काँग्रेसला एकाच दिवसात तीन धक्के बसल्यानंतर काँग्रेस नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री हरकसिंग रावत यांच्या घरी पक्षाच्या अंतर्गत परिस्थितीवर चर्चा झाली.

(Uttarakhand Congress Crisis News)

* काँग्रेसचे हे तीन नेते 'आप'मध्ये दाखल

उत्तराखंड आपचे निमंत्रक जोतसिंग बिश्त यांनी सांगितले की, मनीष सिसोदिया यांनी राजेंद्र प्रसाद रतुरी, कमलेश रमण आणि कुलदीप चौधरी यांच्या पक्षात सामील झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, हे तीन नेते पक्षात आल्याने उत्तराखंडमध्ये आप मजबूत होईल.

Uttarakhand Congress Crisis News |Uttarakhand Congress News Update
देशात लोकसंख्या नियंत्रणाबरोबर समतोलची गरज - योगी आदित्यनाथ

* काँग्रेसमधून राजीनामा देण्याचे कारण काय?

AAP नेते जोतसिंग बिश्त यांच्या मते, उत्तराखंड कॉंग्रेसचे प्रवक्ते राजेंद्र प्रसाद रातुरी, राज्य महिला कॉंग्रेसचे उपाध्यक्ष कमलेश रमण आणि पक्षाचे सोशल मीडिया (Social Media) सल्लागार कुलदीप चौधरी यांनी 2022 च्या उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव होऊनही पक्षातील वाढत्या गटबाजीमुळे राजीनामा दिला आहे. (Congress member Resign News)

* हरकसिंग रावत यांच्या घरी बैठक झाली

एकाच दिवसात काँग्रेसच्या 3 बड्या नेत्यांनी राजीनामे दिल्याचे माहिती मिळताच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी बैठक बोलावली. माजी कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेस नेते हरकसिंग रावत (Harak Singh Rawat) यांच्या घरी बैठक झाली आणि पक्षाच्या अंतर्गत परिस्थितीवर चर्चा झाली. विशेष म्हणजे या बैठकीला माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे सरचिटणीस हरीश रावत (Harish Rawat) उपस्थित नव्हते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com