उत्तराखंड दुर्घटना: अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी सांगितले उत्तराखंड दुर्घटनेचे खरे कारण

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

संस्थेच्या अहवालानुसार, जेथे नैसर्गिक आपत्ती आली आहे, तेथे हजारो टन वजनाचे प्रचंड मोठ मोठे दगडं आणि लाखो टन बर्फ 5600 मीटर उंचीवरून थेट 3800 मीटर खाली पडले. 

चमोली: उत्तराखंडमधील चमोलीमधील नीती खोऱ्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे भूस्खलन तर झालेच त्याचबरोबर लाको टन बर्फ घसरल्यामुळे त्याचे दुष्परिणाम आपल्याला बघायला मिळाले आहे. असे मत अमेरिकन जिओफिजिकल युनियन च्या वैज्ञानिकांची प्रतिष्ठित संस्थेने व्यक्त केला आहे. संस्थेच्या अहवालानुसार, जेथे नैसर्गिक आपत्ती आली आहे, तेथे हजारो टन वजनाचे प्रचंड मोठ मोठे दगडं आणि लाखो टन बर्फ 5600 मीटर उंचीवरून थेट 3800 मीटर खाली पडले. 

हजारो टन वजनाच्या मोठमोठ्या दगडामुळे आणि लाखो टन बर्फ वेगाने खाली पडल्यामुळे ही भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोट्यवधींच्या नुकसानासोबतच बरीच जिवीतहानी झाली आहे. चमोलीच्या नीती खोऱ्यात होणाऱ्या आपत्तीबद्दल  वाडिया इंस्टीट्यूट ऑफ हिमालयन जियोलॉजी,  इसरो, डीआरडीओ सारख्या देशातील वैज्ञानीक संस्था त्याचबरोबर युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानसह विविध देशांतील शास्त्रज्ञांची टिम अभ्यास करत आहे.

भारतीय लष्करात कोरोना निदानासाठी कुत्र्यांची मदत -

अमेरिकन जिओफिजिकल युनियनच्या शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की हजारो टन वजनी खडक आणि लाखो टन बर्फ सातत्याने दोन किलोमीटरपर्यंत खाली पडल्यामुळे या भागातील तापमानात झपाट्याने वाढ झाली आणि या तापमानामुळे बर्फ वेगाने वितळला. परिणामी नदीला अचानक पूर आला आणि त्यामुळे प्रचंड नुकसान झाले.  

चमोली आपत्तीवर संशोधन करणारे अमेरिकन जिओफिजिकल युनियनचे अनेक शास्त्रज्ञांनी असा विश्वास वर्तविला आहे की, ज्या प्रकारे जगभरात पर्यावरणात बदल होत आहे त्यानुसार वातावरण बदलत आहे आणि हवामान बदलाचे सर्व दुष्परिणाम बघायला मिळत आहेत. अशा परिस्थितीत भविष्यात चमोलीसारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये वाढ होवू शकते, त्यासाठी जगातील सर्व देशांना जागरूक राहण्याची गरज आहे, आणि अशी आपत्ती टाळण्यासाठी अधिकाधिक पर्यावरणाची काळजी घेणे गरजेचे असणार आहे.

अमेरिकन जिओफिजिकल युनियनच्या शास्त्रज्ञांनी या नैसर्गिक आपत्तीनंतर केंद्र व राज्य सरकारने सुरू केलेल्या अभियानाचे कौतुक केले आहे. वैज्ञानिकांनी असे म्हटले आहे की, आपत्तीनंतर केंद्र आणि राज्य सरकार सोबतच सर्व वैज्ञानिक संस्थांच्या वैज्ञानिकांनी ज्या वेगात बचाव अभियान राबविले ते कौतुकास्पद आहे. दरम्यान, 2012 मध्ये नेपाळमध्ये झालेल्या आपत्तीनंतर सरकारला असे अभियान सुरू करण्यास कित्येक दिवस लागले होते त्याचबरोबर आपत्तीनंतर हरवलेल्या लोकांच्या सुखरूप सुटकेसाठीही शास्त्रज्ञांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 

संबंधित बातम्या