उत्तराखंडला अखेर नवा मुख्यमंत्री

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 10 मार्च 2021

तीरथ सिंह रावत उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून लवकरच सूत्रे हाती घेतील.

देहरादून : उत्तराखंडमधील राजकीय उलथापालथ अखेर थांबली. त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर नवा मुख्यमंत्री कोण असा प्रश्न निर्माण झाला होता. महत्त्वाचं म्हणजे काही नावांची चर्चा मुख्यमंत्रीपदासाठी केली जात होती. मात्र चर्चेत असलेल्य़ा नावांना मागे टाकत तीरथ सिंह रावत उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून लवकरच सूत्रे हाती घेतील. आज झालेल्या भाजपच्या बैठकीत त्यांची सभागृहाचा नेता म्हणून निवड करण्यात आली.

मागच्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये राजकीय संकट निर्माण झालं होतं. भूतपूर्व मुख्य़मंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्यावर पक्ष आणि आमदार नाराज असल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यातच त्यांनी राजीनामा द्यावा अशी चर्चाही सुरु झाली होती. या चर्चा सुरु असताना त्रिवेंद्र सिहं रावत यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांची मंगळवारी भेटही घेतली. या बैठकीनंतर त्रिवेंद्र सिंह रावत यांनी आपला राजीनामा उत्तराखंडच्या राज्यपालांकडे सुपुर्द केला.

‘’भाजपने हिंदुत्वाचा खेळ माझ्याबरोबर खेळू नये’’

रावत यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण अशी चर्चा सुरु असताना भाजपची देहरादून येथे पार पडलेल्या बैठकीत तीरथ सिंह यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आला. तीरथ सिंह रावत आज सांयकाळी उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याची शक्यता आहे. तीरथ सिंह रावत उत्तराखंडमधील गढवाल लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. तीरथ सिहं रावत खासदार असताना ते उत्तराखंड भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुध्दा राहिले आहेत. आणि सध्या ते भाजपचे राष्ट्रीय सचिव आहेत. 

 

संबंधित बातम्या