उत्तराखंड दुर्घटना: देवभूमीतील बचाव कार्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ मदत करणार

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

उत्तराखंडमधील चामोली येथे रविवारी हिमनदी फुटल्याने मोठा अपघात झाला. आतापर्यंत मदत व बचाव कार्यात चामोली जिल्हा पोलिसांनी 14 मृतदेह सापडल्याचे सांगितले आहे.

चामोली: उत्तराखंडमधील चामोली येथे रविवारी हिमनदी फुटल्याने मोठा अपघात झाला. आतापर्यंत मदत व बचाव कार्यात चामोली जिल्हा पोलिसांनी 14 मृतदेह सापडल्याचे सांगितले आहे. असे सांगितले जात आहे की, अद्याप 125 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. या घटनास्थळी रात्रीही बचावकार्य सुरूच होते. नुकसानीचे मूल्यांकन सुरू आहे.

आज पहाटे चारपासून पुन्हा एकदा बचावकार्य सुरू झाले आहे. बोगद्याजवळ डेब्रिज काढला जात आहे. माहितीनुसार बरेच लोक अजूनही बोगद्यामध्ये अडकले आहेत. या अपघातात प्राण गमावलेल्या लोकांच्या कुटुंबियांना राज्य आणि केंद्र सरकारने भरपाई जाहीर केली आहे. राज्य सरकार चार तर केंद्र सरकार दोन लाख रुपयांचे योगदान देणार आहे. सैन्य, वायुसेना, एनडीआरएफ, आयटीबीपी आणि एसडीआरएफच्या टीम्स मदत आणि बचाव कार्यांसाठी स्थानिक प्रशासनाबरोबर काम करत आहेत. जागतिक नेत्यांनी या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्याचवेळी संयुक्त राष्ट्र संघाने आवश्यकतेनुसार मदत करण्याची ग्वाही दिली आहे.

इंजिनीअरिंग टास्क फोर्ससह लष्कराच्या जवानांच्या प्रयत्नांनंतर बोगद्याचे तोंड साफ झाल्याचे भारतीय लष्कराने सांगितले आहे. जनरेटर आणि शोध दिवे बसवून रात्री काम चालू ठेवले. फील्ड हॉस्पिटल घटनास्थळी वैद्यकीय मदत देत राहिले. आज सकाळी एअर फोर्सची विमान मदत करण्यासाठी घटनास्थळी पोहचली आहे.

डीआयजी आयटीबीपी अपर्णा कुमार यांनी सांगितले की, 'बोगदा 70 ते 80 मीटरपर्यंत साफ केला गेला आहे. जेसीबीच्या मदतीने हा ढिगारा काढण्यात आला आहे. बोगदा सुमारे 100 मीटर लांबीचा असून सुमारे 30-40 कर्मचारी बोगद्यात अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दुसर्‍या बोगद्याचा शोध बचाव पथक घेत आहे.'

उत्तराखंडमध्ये गरज भासल्यास बचाव आणि मदत कार्यात मदत करेल

ग्लेशियरचा काही भाग तुटल्यामुळे ऋषिगंगा खोऱ्यात अचानक आलेल्या पूरात जीवित-मालमत्तेचे नुकसान झाल्याबद्दल संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस अँटोनिया गुतारेस यांनी शोक व्यक्त केला. गरज पडल्यास उत्तराखंडमधील सुरू असलेल्या बचाव व मदत कार्यात संघटना सहकार्य करण्यास तयार आहे अशी ग्वाही त्यांनी दिली.

भारतीय वायुसेनेने बचावकार्य सुरू केले

एमआय -१ आणि एएलएच हेलिकॉप्टरसह हवाई बचाव आणि मदत मोहीम देहरादून ते जोशीमठ येथे पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. यात सुमारे 30 लोक अडकले आहेत. अशी माहिती भारतीय हवाई दलाने दिली आहे.

आयटीबीपीचे प्रवक्ते विवेक पांडे म्हणाले, 'आम्ही दुसर्‍या बोगद्यात शोध मोहीमेत वाढ केली आहे. आम्हाला माहिती मिळाली आहे की तेथे सुमारे 30 लोक अडकले आहेत. बोगदा साफ करण्यासाठी सुमारे 300 आयटीबीपी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार सुमारे 170 लोक बेपत्ता आहेत. आयटीबीपीने काल एका बोगद्यातून 12 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. विविध भागात बचावकार्य सुरू आहे. आवश्यक असल्यास, अधिक पथके पाठविली जातील, आम्ही पहिल्या बोगद्यातून लोकांची सुटका करुन त्यांना बाहेर काढण्याचा पर्यत्न करीत आहोत.

ट्विटरला पाकिस्तान व खलिस्तानशी संबंधित 1178 खाती बंद करण्याचे आदेश -

15 लोकांना मदत

चामोली पोलिसांनी सांगितले, बोगद्यात अडकलेल्यांसाठी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. जेसीबीच्या मदतीने बोगद्याच्या आत पोहोचून मार्ग खुला करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आतापर्यंत एकूण 15 जणांची सुटका करण्यात आली असून वेगवेगळ्या ठिकाणाहून 14 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

उत्तराखंड दुर्घटनेमुळे केंद्रीय मंत्री अमित शहांचा गोवा दौरा रद्द -

 

संबंधित बातम्या