व्ही. के. सिंह यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करा

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

भारतानेच चीनपेक्षा प्रत्यक्ष नियंत्रण रेषा जास्त वेळा ओलांडली असल्याचे वादग्रस्त  विधान  केंद्रीय  वाहतूक  राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी केले.

नवी दिल्ली: भारतानेच चीनपेक्षा प्रत्यक्ष नियंत्रण रेषा जास्त वेळा ओलांडली असल्याचे वादग्रस्त  विधान  केंद्रीय  वाहतूक  राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी केले. सिंहाच्या या विधानावरुन  कॉंग्रेसने  केंद्र  सरकारवर हल्लाबोल  करत  केंद्रीय  संरक्षणमंत्री  राजनाथ  सिंह  यांनी स्पष्टीकरण द्यावे अशी  मागणी  केली  आहे. लोकसभेत कॉंग्रेसचे  नेते  अधीर  रंजन  चौधरी  यांनी  म्हटले  की, ''केंद्रीय  वाहतूक राज्यमंत्री  व्ही. के. सिंह यांनी  ज्या  प्रकारे  हे  वादग्रस्त  विधान  केले  आहे, यामुळे चीन  सरकारला  भारताच्या  विरोधात  आयते  कोलितच  मिळाले. त्यांचे  विधान अनेक  वृत्तपत्रात  प्रसिध्द  झाले असून  त्यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलंडल्याबद्दलचा मुद्दा प्रकर्षाने मांडलेला दिसून येत आहे.

ट्विटरने सरकारचा आदेश मान्य न केल्यास,अधिकाऱ्यांना अटकदेखील होऊ शकते

तसेच चौधरी पुढे म्हणाले, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पूर्व लडाख मधील प्रत्यक्ष  निंयत्रण  रेषेवर  सध्याची  परिस्थीती  काय  आहे. याचे निवेदन करावे अशी मागणी  केली  आहे. त्याचबरोबर  केंद्रीय  वाहतूक  राज्यमंत्री  व्ही. के. सिंह  यांना मंत्रिमंडाळातून  त्वरित  बडतर्फ  करण्यात  यावे  अशी  मागणी यावेळी  त्यांनी  केली.

सिंह  यांनी  रविवारी  तामिळनाडू  दौऱ्यावर  असताना  मदुराई  मध्ये  बोलताना ‘’भारत आणि  चीन  यांच्यामध्ये  प्रत्यक्ष  निंयत्रण  रेषा  आखलेली  नाही. भारत  चीन  यांनी त्यांच्या  आकलनानुसार  प्रत्यक्ष  निंयत्रण  रेषा  मानली  आहे. त्यामुळे  या  दोन  देशांनी अनेक  वेळा  नियंत्रण  रेषेचे  उल्लंघन  केलेले आहे. जर  चीनने  प्रत्यक्ष  निंयत्रण  रेषा दहा  वेळा ओलांडली असेल तर भारताने  पन्नास  वेळा  निंयत्रण रेषा ओलांडली आहे.’’ असे  वादग्रस्त  विधान  व्ही. के. सिंह  यांनी  केले  होते.

मात्र  सिंह  यांच्या  विधानाचा आधार  घेत चीनने आक्रमक भूमिका घेतली आहे. यावरुन भारताला घेरण्याचा  प्रयत्न  चालू  केली  आहे. यावर  कॉंग्रेसने  या  विधानावर प्रकाश  टाकत  व्हि. के. सिंहाना  मंत्रिमंडळातून  काढून  टाकावे अशी  मागणी  केली आहे. भाजपचे  मंत्री  भारताची  चीनविरोधातील  बाजू  कमजोर  करण्याचा  प्रयत्न  करत आहेत. व्ही. के, सिंह यांना मंत्रीमंडळातून  काढून  न  टाकल्यास  तो  भारतीय  जवानांचा  घोर  अपमान  ठरेल.  

 

संबंधित बातम्या