COVID-19 Vaccination: ''गावाचं 100 टक्के लसीकरण करा आणि मिळवा 10 लाख रुपये''

दैनिक गोमंतक
मंगळवार, 18 मे 2021

पंजाबमध्ये आतापर्यंत 5,50,000 कोविड रुग्ण आढळले असून त्यापैकी 4,19,000 रुग्णांनी कोरोनावरती मात केली आहे.

खेड्यांमध्ये कोरोना लसीकरणाला (COVID-19 Vaccination) चालना देण्यासाठी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amrinder Singh) यांनी आज एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी लसीकरणातील 100 टक्के लक्ष्य गाण्यासाठी गावाला 10 लाख रुपयांचे विशेष अनुदान जाहीर केले आहे. यासह, कॅप्टन अमरिंदर यांनी पंच आणि सरपंचांना कोरोनाविरूद्धच्या युद्धात त्यांची गावं पुढे नेण्याचे आवाहन केले आहे. लोकांना कोरोना चाचणी करण्यास उद्युक्त करावे आणि लसीकरण करण्यासाठी प्रवृत्त करावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी पंच-सरपंचांना केले आहे. त्यांनी 2000 हून अधिक प्रमुख ग्रामपंचायतीच्या सदस्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. सरकारने आपत्कालीन कोविड उपचारासाठी सरपंचांना त्यांच्या पंचायत निधीतून दररोज 5000 रुपये वापरण्यास परवानगी दिली असल्याचे  मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ही मर्यादा जास्तीत जास्त 50 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते.(Vaccinate the village and get Rs 10 lakh)

मित्राचा सल्ला जीवावर बेतला; कोरोनाच्या भितीने रॉकेल प्यायला

पंजाबमध्ये आतापर्यंत 5,50,000 कोविड रुग्ण आढळले असून त्यापैकी 4,19,000 रुग्णांनी कोरोनावरती मात केली आहे. तसेच, 12,086 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. मागच्या 24 तासात पंजाबमध्ये 6,881 रुग्ण आढळले असून 8,552 रुगणांनी कोरोनावरती मात केली आहे. तर 191 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. पंजाबमध्ये मागच्या काही दिवसात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. 

देशात आतापर्यंत 18.44 कोटी नागरिकांना कोरोनाचा लसीचा पहिला डोस दिलेला आहे. तसेच 4.07 कोटी नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आलेला आहे. देशातील आतापर्यंत 3 टक्के नागरिकांच यशस्वी लसीकरण झालेला आहे. कोरोना लसीबाद्ल अनेक नागरिकांमध्ये भीती आहे. त्याचबरोबर, अनेक ठिकाणी लसीचा तुटवडा आहे. त्यातच मुख्यमंत्र्याचा निर्णय पंजाबमधील लसीकरणाला बळकटी देईल.  

 

संबंधित बातम्या