Vaccination: ''डोअर टू डोअर व्हॅक्सिनेशन' चा आदेश नाही

भारतामध्ये एकाच दिवसात एक कोटीहून अधिक लसीचे डोस देण्याचा विक्रम तीनवेळा साध्य झाला आहे.
Vaccination: ''डोअर टू डोअर व्हॅक्सिनेशन' चा आदेश नाही
Corona vaccinationDainik Gomantak

नवी दिल्ली : कोरोना लसीकरणाबाबत (Corona Vaccination) एका याचिकेत असे म्हटले होते की घरोघरी जाऊन लसीकरण केल्यास देशातील लसीकरणाला गती येईल. पण सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) असा आदेश देण्यास स्पष्ट नकार दिला. 'डोअर टू डोअर व्हॅक्सिनेशन' ("Door-to-door vaccination)करण्याचा आदेश द्यावा अशा आशयाची याचिका यूथ बार असोसिएशन ने सर्वोच्च न्यायालयानेमध्ये (Supreme Court)दाखल केली होती. यूथ बार असोसिएशनच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करण्यास नकार दिला आहे. सद्या सर्वत्र लसीकरण हे व्यवस्थित पार पडत आहे. असेही सर्वोच्च न्यायायलाने सांगितले.

Corona vaccination
मद्यप्राशन करण्यासंदर्भात दिल्ली सरकारने जारी केली नवी नियमावली 

यूथ बार असोसिएशन नावाच्या संस्थेने दाखल केलेल्या एका याचिकेत असे म्हटले होते की, घरोघरी जाऊन लसीकरण केल्यास सध्या सुरु असलेल्या लसीकरणाचा वेग वाढेल. यामध्ये वयस्कर नागरिक, दिव्यांग आणि इतर दुर्बल घटकांना यामध्ये मदत होईल. परंतु, न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड(Justice D.Y. Chandrachud) यांच्या बेंचने अशा प्रकारचा आदेश देण्यास नकार दिला.

यामध्ये, सर्वोच्च न्यायालयाने असे सांगितले की, 'घरोघरी जाऊन लसीकरण करायचे असल्यास प्रशासनासमोर अनेक अडचणी उभ्या राहतील'. देशातील लसीकरण यंत्रणेवर व होत असलेल्या लसीकरणावर सुरुवातीपासूनच सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष आहे. देशात सद्या लसीकरणाचा कार्यक्रम व्यवस्थित सुरु आहे. त्याबाबत काही अडचण असल्यास त्याची सूचना तुम्ही सरकारला करु शकता.

Corona vaccination
भारतात कोरोना लसीकरणाचा आकडा 70 कोटी पार; 13 दिवसात टोचले 10 कोटी डोस

देशातील लसीकरणाने 70 कोटीचा टप्पा :

गेल्या महिन्यापासून भारतातील (India) कोरोना लसीकरणाचा वेग वाढला असल्याचे दिसून येत आहे. आता पर्यंत कोरोनाच्या सुरु असलेल्या लसीकरणामध्ये गेल्या काही महिन्यात लसीचे कित्येक कोटी डोस देऊन विक्रमाची नोंद झाली. आता त्यात आणखी एका सकारात्मक बाबीची भर पडली आहे. भारतातील कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाने 70 कोटी डोसचा टप्पा ओलांडला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री (Union Health Minister)मनसुख मांडविय यांनी ही माहिती दिली आहे. देशात आतापर्यंत कोरोना लसीचे एकूण 70 कोटी 67 लाख 36 हजार 715 डोस देण्यात आले आहेत. तर राज्यात ६ कोटी 40 लाख 78 हजार 584 इतके डोस देण्यात आले आहेत.

तसेच, गेल्या आकरा दिवसात भारतामध्ये एकाच दिवसात एक कोटीहून अधिक लसीचे डोस देण्याचा विक्रम तीनवेळा साध्य झाला आहे. काल मंगळवारी एकाच दिवसात 1.13 कोटी लोकांना कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. येथून पुढच्या काळात लसीकरणाचा वेग आणखी वाढवण्यात येणार असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com