लसीकरण पथक गावात येताच ग्रामस्थांनी मारल्या नदीत उड्या

गोमंन्तक वृत्तसेवा
सोमवार, 24 मे 2021

देशभर लसिकरण(Vaccination) मोहिम राबविली जात आहे. आता 18 ते 44 वयाच्या नागरीकांनाही लसिकरण सुरू झाले आहे.  मात्र लसीकरणाबाबतची एक वेगळीच घटना उत्तर प्रदेशच्या(UP) बाराबंकी जिल्ह्यात घडली आहे.

बाराबंकी: देशभर लसिकरण(Vaccination) मोहिम राबविली जात आहे. आता 18 ते 44 वयाच्या नागरीकांनाही लसिकरण सुरू झाले आहे. त्याच बरोबर सरकारही लसीकरणासाठी समाजात जनजागृती करतांना वेगवेगळे उपक्रम राबवितांना दिसत आहे. मात्र लसीकरणाबाबतची एक वेगळीच घटना उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यात घडली आहे.

उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यात लोकं कोरोना लसीबाबत इतके घाबरले आहेत की, गावात आलेले लसीकरण पथक पाहून ग्रामस्थांनी घाबरून शरयू नदीत उड्या मारल्या. हे प्रकरण जिल्ह्यातील रामनगर तहसीलमधील सिसोंदा गावात घडले आहे. शनिवारी कोविड लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागाची टीम गावात दाखल झाली. लस देणार या भितीने  ग्रामस्थांनी गाव सोडले आणि कुटूंबासह जवळच्या शरयू नदीकडे गेले. जेव्हा आरोग्य विभागाची टीम नदीकडे येवू लागली तेव्हा महिला आणि पुरुषांसह अनेक नागरीकांनी नदीत उड्या मारल्या आणि तासंतास ते नदिच्या पाण्यातच बसून राहिले.

अनेक वर्ष राहील कोरोना लसीचा प्रभाव; बूस्टर डोसने वाढवता येतील अँटीबॉडी  

मन वळविण्यासाठी पोहचले एसडीएम

जेव्हा ग्रामस्थांची मन वळविण्यासाठी एसडीएम(SDM) चे राजीव शुक्ला घटनास्थळी पोहचले तेव्हा गावकरी नदितून बाहेर आले. लसीकरण होणार या भितीने गावातील लोक नदीत उड्या मारल्याची माहिती मिळाल्यामुळे प्रशासनाला मोठा धक्का बसला आणि आनन फानन येथील रामनगर तहसीलचे एसडीएम राजीव शुक्ला घटनास्थळी पोहोचले व ग्रामस्थांना समजावण्यास सुरुवात केली. बराच काळ मनापासून प्रयत्न करूनही केवळ 14 गावकरी नदीतून बाहेर आले आणि त्यांना कोविडची लस टोचण्यात आली.

पृ्थ्वीवर लॉकडाउन म्हणून आकाशात लावलं लग्न 

गावकरी काय म्हणतात? 
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, आम्ही कोरोना लस आणि चाचणीच्या भीतीने लपलो होतो. एसडीएम साहब यांच्या सूचनेवर आम्ही लस घेण्यास तयार झालो. एसडीएम राजीव शुक्ला म्हणाले की, कोरोना लसीच्या भीतीने गावकरी नदीत गेले होते. त्यांनची मन वळविण्याची आम्ही प्रयत्न केला असता त्यापैकी फक्त 14 जणांना लस देण्यात आली.लसीकरणाबाबत आता इतरांना जागरूक केले जात आहे.

काय म्हणतात हेल्थ टीमचे अधिकारी
रामनगरचे एस के एस पाठक म्हणाले की, लोक या मोहिमेला पाठिंबा देत आहेत आणि कोरोना टेस्ट करून घेण्यासाठी येत आहेत. आम्ही विविध गावात ही मोहीम राबवित आहोत. दिवसातून एका गावातून किमान 60 नमुने गोळा केले जात आहेत.
 

संबंधित बातम्या