'नवीन वर्षात येणार कोरोनावरील लस'

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑक्टोबर 2020

सुरक्षित लस लवकरात लवकर तयार होण्यासाठी जागतिक आरोग्य यंत्रणेची धडपड सुरू आहे. कोविडची लस सुरक्षित स्वरूपात लवकरात लवकर उपलब्ध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे

नवी दिल्ली-  भारतातील कोरोना लस पुढील वर्षाच्या सुरवातीला येण्याची आशा आहे, असा पुनरूच्चार केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज केला. कोविड-१९ मंत्रिगटाच्या बैठकीत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. जागतिक आरोग्य संघटनेनेही (डब्लूएचओ) या वर्षीखेरपर्यंत किंवा पुढच्या वर्षीच्या सुरवातीलाच लसीची नोंदणी होईल, असे म्हटले आहे. 

हर्षवर्धन म्हणाले, पुढच्या वर्षीच्या प्रारंभीच देशात एकाहून जास्त स्त्रोतांकडून कोरोना लस उपलब्ध असेल अशी आशा आहे. या लसीच्या वितरणासाठी विशेष प्रणाली विकसित करण्याची रणनीती सुरू आहे. कोरोनामुळे जगभरातील तब्बल ३.७४ कोटी लोक सध्या बाधित झाले आहेत. आजअखेर १० लाख ७६ हजार ७६४ लोकांनी जीव गमावले आहेत. सुरक्षित लस लवकरात लवकर तयार होण्यासाठी जागतिक आरोग्य यंत्रणेची धडपड सुरू आहे. कोविडची लस सुरक्षित स्वरूपात लवकरात लवकर उपलब्ध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे, डब्लूएचओच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले आहे.

चाळीस कंपन्यांच्या लस विविध टप्प्यात 

जगातील वेगवेगळ्या देशांतील किमान ४० कंपन्यांच्या कोरोना लसी वैज्ञानिक चाचण्यांच्या वेगवेगळ्या टप्प्यांत आहेत. आणखी १० कंपन्यांच्या चाचण्या तिसऱ्या टप्प्यात आहेत. ही लस किती सुरक्षित आहे हे त्या कंपन्या किंवा संबंधित देश डब्ल्यूएचओला कळवतील. ही महामारी जगभरात सुरू झाल्यावर या वर्षीच्या सुरवातीपासूनच डझनभर देशांनी त्यावरील लसीचे संशोधन सुरू केले. मात्र आतापावेतो ज्या ३ लसींना मान्यता देण्यात आली, मात्र त्यापैकी एकाही लसीच्या नोंदणीला डब्ल्यूएचओने अद्याप मान्यता दिलेली नाही.
 

संबंधित बातम्या