परदेशात आपत्कालीन वापरास मान्यता मिळालेल्या लसीला भारतातही मिळणार मंजूरी 

दैनिक गोमंतक
मंगळवार, 13 एप्रिल 2021

देशातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी  भारत सरकारने परदेशातील आपत्कालीन लस वापरण्यासाठी नॅशनल  एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सीन  अॅडमिनिस्ट्रेशन फोर कोविड19 कडे प्रस्ताव ठेवला होता.

नवी दिल्ली:  देशातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी  भारत सरकारने परदेशातील आपत्कालीन लस वापरण्यासाठी नॅशनल  एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सीन  अॅडमिनिस्ट्रेशन फोर कोविड19 कडे प्रस्ताव ठेवला होता.  या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून देशात लवकरच परदेशी लस आयात करतय येणार आहे. परदेशात ज्या लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे त्या लस आता भारतातही वापरता येणार आहेत.  कोरोनाविरूद्ध लस परदेशात ज्या लसीला आपातकालीन वापरास यूएसएफडीए, ईएमए, यूके एमएचआरए, पीएमडीए, जापान आणि इतरांनी मान्यता दिली आहे. याशिवाय जी लस  डब्ल्यूएचओच्या यादीत समाविष्ट आहे. त्या लसीला भारतातही  आपत्कालीन मान्यता द्यावी, अशा निर्णय  एनईजीव्हीएसीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. (Vaccines approved for emergency use abroad will also be approved in India) 

धक्कादायक! कोरोनाच्या सरकारी रूग्णालयात माळी घेतायेत सैंपल

याशिवाय एनईजीव्हीएसीने परदेशात तयार झालेली ज्या लसीला त्या देशातील औषध नियामकाने आपत्कालीन उपयोग करण्यास मान्यता दिली आहे. ती लस भारतात  पहिल्या टप्प्यात केवळ 100 लोकांनाच देण्यास सांगितले आहे. त्या लोकांचे पुढील 7 दिवस निरीक्षण केले जाईल. त्याना कोणताही त्रास न झाल्यास त्या लसीला भारतातील लसीकरण मोहिमेत समाविष्ट केले जाईल, असेही सांगण्यात आले आहे.  म्हणजेच, देशात क्लिनिकल चाचण्याशिवायच प्राथमिक चाचणीवरच लसीला परवानगी असेल.

कुंभमेळ्यात 102 भाविक कोरोना पॉझिटिव्ह

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने रशियाच्या स्पुटनिक-5 लसीला आपत्कालीन वापरासाठी अधिकृत औषध  म्हणून परवानगी दिली आहे.  परंतु त्याआधी ही लस क्लिनिकल ट्रायल फेज होती. अशा परिस्थितीत जेव्हा जगभरात लसीला आणीबाणीच्या वापरास  मान्यता  देण्याची चर्चा सुरू झाली या चाचण्यांमध्ये बराच वेळ जाईल.  म्हणूनच, परदेशी कोरोना लस मंजूर करण्याच्या प्रक्रियेस गती देण्यासाठी भारत सरकारने प्राथमिक चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये १०० लोकांना ही लस दिली जाईल आणि कोणतेही दुष्परिणाम न झाल्यास ते भारतातही वापरण्यास मंजूर केले जाईल.

सध्या भारतातील तीन लस, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन, अॅस्ट्रजेनिका-सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशिल्ड आणि रशियाच्या स्पुटनिक व्ही यांना आपत्कालीन उपयोगास मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी भारत बायोटेकच्या कोवाक्सिन आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोविशिल्ड यांना दोन लस दिल्या जात आहेत.

संबंधित बातम्या