हे यूरोपातलं शहर आहे की, भारतातलं गाव...!

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 8 जानेवारी 2021

केरळमधील करक्कड गावात बनविलेले वाघभानंद पार्कचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

केरळ: केवळ निसर्गच नाही तर बर्‍याच वेळा मनुष्य अशा गोष्टी देखील बनवतो ज्यास लोक पहातच राहतात. सोशल मीडियावर मानवी वास्तुकलेची अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांची दखल घेतली जात नाही. केरळमधील एका उद्यानात मानवांनी बनवलेल्या अशा सुंदर वास्तुकलेचे दृश्य आपल्याला बघायला मिळाले. हे उद्यान अशा प्रकारे डिझाइन केलेले आहे की ते पाहून लोकांना असे वाटते की ते एखाद्या युरोपियन शहरात आले आहेत. या उद्यानाचे फोटोही इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. नेटकऱ्यांकडून पार्कमधील डिझाइनर पाथ-वे आणि मॉडर्न आर्किटेक्चरचं विशेष कौतुक होतंय.

केरळमधील करक्कड गावात बनविलेले वाघभानंद पार्कचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  केरळचे पर्यटनमंत्री कडकमपल्ली सुरेंद्रन यांच्या हस्ते या उद्यानाचे उद्घाटन झाले. युरोपातील शहराप्रमाणे दिसणारं हे केरळमधील एक पार्क आहे. केरळमधल्या कोझीकोडे जिल्ह्यातील करक्कड गावात हे नवीन पार्क तयार करण्यात आलं आहे. या उद्यानाचे डिझायनर मार्ग आणि आधुनिक वास्तुकला लोकांना आवडत आहे. या उद्यानात स्टॅच्यू, ओपन स्टेज, बॅडमिंटन कोर्ट, ओपन जिम आणि मुलांसाठी स्वतंत्र पार्क आहे. अपंगांना लक्षात ठेवून उद्यानातील शौचालय आणि मार्ग तयार केले गेले आहेत. यासह अंधांनाही अडचणी येऊ नयेत म्हणून येथे टेकटाईल टाईल्स देखील बसविण्यात आल्या आहेत.

केरळमधील सामाज सुधारक वागभटानंद गुरूंच्या सन्मानार्थ हा पार्क तयार करण्यात आला आहे. २. ८० कोटी रुपये खर्च करुन वागभटानंद यांनी स्थापना केलेल्या उरलुंगल लेबर कॉन्ट्रॅक्टर्स कोऑपरेटिव्ह सोसायटीने (यूएलसीसीएस) पार्कचे बांधकाम केले आहे.

केवळ स्थानिक लोकच नाही तर सोशल मीडियावर देखील, लोकांना या सुंदर पार्कचे आर्किटेक्चर आणि फोटो खूप आवडत आहे. यावर लोक चर्चा करीत आहेत आणि एकमेकांशी या पार्कचे फोटो  शेअर करत आहेत.

आणखी वाचा:

बर्ड फ्लूमुळे या राज्यांमध्ये अंडी एका आठवड्यासाठी बंद -

संबंधित बातम्या