वल्लभगडमध्ये जमावाकडून पोलिसांवर जोरदार दगडफेक

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

निकिताच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याची मागणी करणारा ठराव मांडण्यासाठी आज महापंचायत बोलावण्यात आली होती.  महापंचायतीत आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.  मात्र, महापंचायत सुरू असतानाच काही लोकांनी फरिदाबाद-वल्लभगड महामार्गावर उतरत वाहतूक रोखली.

वल्लभगड-   फरिदाबादमध्ये झालेल्या निकीता तोमरच्या हत्याकांडाचे आज वल्लभगडमध्ये तीव्र पडसाद उमटले. निकिताच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याच्या मागणीसाठी फरिदाबाद वल्लभगड महामार्ग आज रोखून धरला. तसेच जोरदार दगडफेकही केली. हिंसक जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना दगडफेक करावी लागली. 

निकिताच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याची मागणी करणारा ठराव मांडण्यासाठी आज महापंचायत बोलावण्यात आली होती.  महापंचायतीत आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.  मात्र, महापंचायत सुरू असतानाच काही लोकांनी फरिदाबाद-वल्लभगड महामार्गावर उतरत वाहतूक रोखली. पोलिसांनी जमावाला हटविण्याचा प्रयत्न केल्यानंतर जमावाने पोलिसांवर दगडफेक सुरू केली. तसेच वाहनांचीही तोडफोड केली. हिंसक झालेल्या जमावाला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.  महापंचायतीसाठी परवानगी घेण्यात आली नव्हती, अशी माहिती पोलिस उपआयुक्त सुमेर सिंह यांनी दिली. अग्रवाल महाविद्यालयात शिकणाऱ्या निकिताला गेल्या सोमवारी तौसिफ आणि त्याच्या मित्रांनी अडविले होते. तिला बळजबरीने मोटारीत बसविण्याचा प्रयत्नही केला. निकिताने त्याला प्रतिकार केल्यानंतर तौसिफने तिच्यावर गोळी झाली. 
 

संबंधित बातम्या