'यूपी'तल्या गाड्यांवरील जातीचे स्टिकर्स महाराष्ट्रीयन शिक्षकामुळे होणार गायब?

दैनिक गोमन्तक
रविवार, 27 डिसेंबर 2020

उत्तर प्रदेश परिवहन विभागाने नंबर प्लेटवरुन जातीची ओळख सांगणाऱ्या गाड्यांवर कारवाई करण्याची पावलं उचलली आहे. हिंदुस्तान टाईम्स च्या माहितीनुसार, परिवहन कार्यालयाने पंतप्रधान कार्यालयाच्या सूचनेनंतर ही कारवाई सूरू करण्यात आली आहे.

लखनऊ: उत्तर प्रदेशातल्या राजकारणात जाती नेहमीच महत्त्वाच्या ठरल्या आहेत. परंतु, गेल्या काही वर्षांत राज्यातील वाहनांच्या नंबर प्लेटवर धैर्याने जातीची ओळख दाखवणे हे एक फॅड बनलं आहे.

यादव, जाट, गुरजर, ब्राह्मण, पंडित, क्षत्रिय, लोधी आणि मौर्य अशा विविध जातींच्या नावाचे स्टिकर्स एसयूव्ही, कार, मोटरसायकल आणि अन्य गाड्यांच्या नंबर प्लेटसवर लावले जातात. त्यातून एक प्रकारचं सामाजिक वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न दिसतो.

यादव, जाट, गुर्जर, ब्राह्मण, पंडित, खत्री, लोधी आणि मौर्य या जाती जातीच्या आणि पोट-जातीच्या नावाचे टॅग्ज त्यांच्या कार, मोटारसायकलींवरील, गाड्यांच्या नंबर प्लेटसवर लावले जातात राजकीय स्थान समाजात वर्चस्व निर्माण करण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करण्याच वातावरण येथे दिसून येतं.

परंतु, आता उत्तर प्रदेश परिवहन विभागाने नंबर प्लेटवरुन जातीची ओळख सांगणाऱ्या गाड्यांवर कारवाई करण्याची पावलं उचलली आहे. हिंदुस्तान टाईम्स च्या माहितीनुसार, परिवहन कार्यालयाने पंतप्रधान कार्यालयाच्या सूचनेनंतर ही कारवाई सूरू करण्यात आली आहे.

परिवहन आयुक्त मुकेश चंद्रा यांनी सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना (आरटीओ) पाठविलेल्या आदेशावरून जातीचे स्टिकर लावणारी वाहने आता जप्त केली जातील. महाराष्ट्रातील शिक्षक हर्षल प्रभू यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने या प्रकरणाची दखल घेवून या विषयात लक्ष घातले आहे.

प्रभू म्हणाले की, अशा स्टिकर्सचे प्रदर्शन हे समाजातील बांधिलकीला एक धोका आहे. असे हर्षल प्रभू यांनी म्हटले होते. “अशा प्रकारचे स्टिकर वाहनांवर चिकटवू नयेत. जे लोक या कारवाईत दोषी आढळतील, त्यांचे वाहन जप्त केले जाईल. 

 

संबंधित बातम्या